UPSC Recruitment 2021 | भारत सरकारच्या विविध विभागात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, पगार देखील लाखात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  UPSC ची परीक्षा देऊन भारत सरकारच्या विविध विभागांत अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. (UPSC Recruitment 2021) UPSC ने प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, जॉइंट असिस्टंट डायरेक्टर, सीनिअर असिस्टंट कंट्रोलर माइन्स या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या इच्छुक (UPSC Recruitment 2021) उमेदवारांना या विभागात काम करण्याची इच्छा आहे अशांनी upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2021 आहे.

 

असा करा अर्ज

 

उमेदवार https://www.upsc.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन पदांसाठी अर्ज करु शकतात. तसेच https://www.upsc.gov.in/sites/default/files/Advt या लिंकवर क्लिक करुन अधिकृत नोटिफिकेशनही पाहू शकता. याच भरती प्रक्रियेअंतर्ग 36 पदं भरली (UPSC Recruitment 2021) जाणार आहेत.

 

पदाचे नाव आणि पदाची संख्या

 

  • प्रोफेसर Professor (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) – 1 पद
  • असोसिएट प्रोफेसर Associate Professor (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग) – 3 पदं
  • असोसिएट प्रोफेसर Associate Professor (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/माहिती प्रसारण इंजिनीअरिंग) -3 पदं
  • असिस्टंट प्रोफेसर Assistant Professor (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) -7 पदं
  • असिस्टंट प्रोफेसर Assistant Professor (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/सूचना औद्योगिक इंजिनीअरिंग) -5 पदं
  • जॉईंट असिस्टंट डायरेक्टर (Joint Assistant Director) – 3 पदं
  • डेप्युटी डायरेक्टर (Deputy Director) – 6 पदं
  • इंडियन ब्युरो ऑफ माईन्स मध्ये सीनियर कंट्रोल ऑफ माईन्स (Senior Control of Mines in Indian Bureau of Mines) – 8 पदं

 

शैक्षणिक पात्रता

 

प्रोफेसर (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग)

 

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा मास्टर डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. तसेच पीएडी आणि शिक्षण, संशोधन आणि/किंवा नोकरीत 10 वर्षांचा अनुभव आवश्यक. यामध्ये कमीत कमी 5 वर्षे तरी सहायक प्रोफेसर/रीडर किंवा समकक्ष ग्रेडमध्ये काम केलेले असावे. (UPSC Recruitment 2021)

 

असोसिएट प्रोफेसर (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग)

 

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर्स ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण किंवा समकक्ष पदवीसोबत इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑप टेक्नॉलॉजी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंगमध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी आवश्यक. (UPSC Recruitment 2021)

 

असिस्टंट प्रोफेसर (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग)

 

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेची प्रथम श्रेणी किंवा समकक्ष बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी आवश्यक.

 

असिस्टंट प्रोफेसर (कम्प्युटर इंजिनीअरिंग / माहिती तंत्रज्ञान इंजिनीअरिंग)

 

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नोलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणी किंवा समकक्षच्यासोबत कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/माहिती प्रसारण इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नोलॉजी उत्तीर्ण आवश्यक.

 

जॉइंट असिस्टंट डायरेक्टर

 

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.टेक किंवा बी.ई. किंवा बी.एसी केलेलं असणं आवश्यक आहे.

 

डेप्युटी डायरेक्टर

 

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा गणित किंवा कॉमर्स किंवा मानसशास्त्र किंवा समाजकार्य किंवा लोक प्रशासन किंवा व्यवसाय प्रशासनामध्ये मास्टर्स डिग्री आवश्यक.

 

वयोमर्यादा

 

प्रोफेसर (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) – 53 वर्षे

असोसिएट प्रोफेसर (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग) – 50 वर्षे

असोसिएट प्रोफेसर (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/माहिती प्रसारण इंजिनीअरिंग) – 50 वर्षे

असिस्टंट प्रोफेसर (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) – 35 वर्षे

असिस्टंट प्रोफेसर (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/सूचना औद्योगिक इंजिनीअरिंग) – 35 वर्षे

जॉईंट असिस्टंट डायरेक्टर – 30 वर्षे

डेप्युटी डायरेक्टर – 40 वर्षे

इंडियन ब्युरो ऑफ माइन्समध्ये सीनियर कंट्रोल ऑफ माईन्स – 40 वर्षे

अर्जासाठी फी

उमेदवारांना अर्जासाठी 25 रुपये (SC/ST/PWBD/महिलांना सूट) भरावी लागेल.

 

Web Title : UPSC Recruitment 2021 | upsc recruitment 2021 officers in this department of the government of india can be without examination

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Director Ramkumar Shedge | कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित

WhatsApp New Features | व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये लवकरच येतील 8 नवीन फिचर्स, वापर करणे होईल आणखी सोपे; जाणून घ्या

Gadchiroli | गडचिरोलीमध्ये पोलिस अन् नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक ! मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’, 4 पोलिस जखमी