UPSC ची परीक्षा जाहीर ; एवढ्या जागांची होणार भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना काल मंगळवारी आयोगाच्या संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे. या वर्षीची नागरी सेवा परीक्षा २ जून रोजी होणार आहे. भारतीय प्रशासन सेवा(IAS) ,भारतीय परराष्ट्र सेवा(IFS ), भारतीय पोलीस सेवा (IPS ) अशा सुपर क्लासवन पदासाठी हि भरती घेण्यात येते. यावर्षी या परीक्षेच्या माध्यमातून ९८६ पदे भरली जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हणले आहे.

या तारखेला भरा ऑनलाईन अर्ज-
UPSCसाठी १९ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावर इच्छुकांना या परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येऊ शकणार आहेत. पात्रतेच्या अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व व्यक्तींना या पदासाठी परीक्षा देता येणार आहेत.

UPSC परीक्षेस बसण्याच्या पात्रतेच्या अटी-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसू इच्छिणारा व्यक्ती हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
त्या व्यक्तीने वयाची कमीत कमी २१ वर्ष पूर्ण केलेली असावी.
तसेच परीक्षेला बसू इच्छिणारा व्यक्ती हा ३२ वयापेक्षा अधिक नसावा ( आरक्षणाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गसाठी वयाची अट वेगवेगळी)

या तारखा लक्षात ठेवा-
१९ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत पूर्व परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची मुदत.
२ जून रोजी होणार UPSCची पूर्व परीक्षा
२० सप्टेंबर रोजी सुरु होणार UPSCची मुख्य परीक्षा

केंद्रीय वनसेवा परीक्षे बाबत-
UPSCची आणि वनसेवेची पूर्व परीक्षा एकच असल्याने ती २ जूनला घेण्यात येणार
१ डिसेंबरपासून मुख्य परीक्षा सुरु होणार
केंद्रीय वनसेवेच्या ९० जागांची भरती यावर्षी घेण्यात येणार आहे.