UPSC Result 2019 : ‘टॉपर’ प्रदीप सिंहच्या वडिलांनी घर विकून शिकवलं, मुलगा बनला IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीएससीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. देशाच्या सर्वोच्च परीक्षांपैकी या एका परीक्षेत प्रदीप सिंहने ऑल इंडिया रँक वन मिळवले आहे. या यादीमध्ये २६ व्या स्थानीही प्रदीप सिंहचे नाव आहे. आयआरएस अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या या प्रदीप सिंहनेही आपल्या वडिलांचा आणि कुटुंबाचा मान वाढवला आहे. जाणून घेऊया प्रदीप सिंहच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी…

प्रदीप सिंहची सीएसइ २०१८ मध्ये ऑल इंडिया रँक
एआयआर ९३ प्राप्त केली होती. २२ वर्षीय प्रदीपने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. उत्तीर्ण झाल्यानंतर प्रदीपने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या आयुष्यात मी जितका संघर्ष केला त्याहीपेक्षा जास्त माझ्या आई-वडीलानी संघर्ष केला आहे.

प्रदीप सिंहचे वडील पेट्रोल पंपावर काम करतात. प्रदीपचे एक मोठे स्वप्न होते. अशा परिस्थितीत त्याने दिल्लीला येण्याचे ठरवले. २०१७ मध्ये जून महिन्यात तो दिल्लीला आला होता, तेथे त्याने बाजीराव कोचिंगमध्ये प्रवेश घेतला.

प्रदीप म्हणतो की, बर्‍याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्याच्या आई-वडिलांनी अभ्यासात हे सर्व येऊ दिले नाही. प्रदीपने सांगितले कि त्याच्या घरात पैशांची खूप अडचण होती, पण माझ्या आई-वडिलांचा आत्मविश्वास माझ्यापेक्षा खूप जास्त होता.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रदीपचे वडील म्हणाले होते की, “मी इंदूरमधील एका पेट्रोल पंपावर काम करतो. मला नेहमीच माझ्या मुलांना शिकवायचे होते, जेणेकरुन ते आयुष्यात चांगले काम करतील.” प्रदीपने सांगितले की, त्याला यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे, मला पैशांची कमतरता होती. अशा परिस्थितीत मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी माझे घर विकले. त्या काळात माझ्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला होता. पण आज मी माझ्या मुलाच्या यशाने आनंदी आहे.”

प्रदीपने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याची कोचिंग फी सुमारे दीड लाख रुपये होती. तसेच वरखर्च वेगळा होता. माझ्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी वडिलांनी घर विकले.

प्रदीपने सांगितले की- माझ्या वडिलांची आयुष्यभराची मालमत्ता त्यांचे इंदूर येथील घर होते. पण माझ्या अभ्यासासाठी ते विकले आणि एका क्षणासाठी मी हे का करत आहे याचा विचार देखील केला नाही. त्याने म्हटले की, जेव्हा मला हे कळले तेव्हा माझे परिश्रम करण्याची आवड दुप्पट झाली. माझ्या वडिलांच्या या बलिदानाने मला अधिक सक्षम केले. आणि मी ही यूपीएससी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पास करण्याचा निर्णय घेतला.

त्याचे वडील इंदूरमधील निरंजनपूर देवास नगर येथील डायमंड पेट्रोल पंपवर काम करतात. त्याची आई गृहिणी व त्याचा भाऊ खासगी क्षेत्रात काम करतो. त्याने सांगितले की, माझ्या प्रत्येक अडचणीत हे तिघेही संरक्षक भिंतीसारखे उभे होते. वडील आणि भावाने माझ्या अभ्यासाची खूप काळजी घेतली. जेव्हा माझी यूपीएससी मेन परीक्षा चालू होती, तेव्हा माझ्या आईला रुग्णालयात दाखल केले होते. पण मला याबाबत माहिती दिली गेली नाही, जेणेकरून मी कोणत्याही प्रकारे ताण घेऊ नये, ज्याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. प्रदीपने सांगितले की, वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी फक्त घरच नव्हे तर बिहारच्या गोपालगंज या गावातील वडिलोपार्जित जमीनही विकली, जेणेकरुन मला दिल्लीत पैशांची अडचण होऊ नये. प्रदीपचा जन्म बिहारमध्ये झाला होता, त्यानंतर ते इंदूरला गेले होते.