यूपीएससी निकाल जाहीर ; सृष्टी देशमुख महाराष्ट्रातून अव्वल तर देशात पाचवी

दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कनिष्क कटारीया हा देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर अक्षत जैन व जुनैद अहमद यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राची सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी तर महाराष्ट्रातून अव्वल स्थानी आली आहे. लोकसेवा आयोगाकडून एकूण ७५९ जागांसाठी आताची परीक्षा घेण्यात आली होती.

युपीएससी परीक्षेचा निकाल (महाराष्ट्र)

सृष्टी देशमुख – 5 वी
तृप्ती धोडमिसे – 16 वी
वैभव गोंदणे – 25 वा
मनिषा आव्हाळे – 33 वी
हेमंत पाटील – 39 वा
युपीएससी परीक्षेचा निकाल (भारत)
कनिष्क कटारिया
अक्षत जैन
जुनैद अहमद
श्रवण कुमात
सृष्टी जयंत देशमुख
शुभम गुप्ता
कर्नाटी वरूणरेड्डी
वैशाली सिंह
गुंजन द्विवेदी
तन्मय वशिष्ठ शर्मा