UPSC Result | ‘महाराष्ट्रात पहिली आलेल्या पुण्याच्या मृणालीनं सांगितलं यशाचं ‘गुपित’

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन –  UPSC Result | युपीएससी (UPSC Result) 2020 चा निकाल अखेर जाहीर करण्यात आला. या परिक्षेत यशस्वी ठरलेल्या 751 उमेदवारांपैकी जवळपास 100 उमेदवार महाराष्ट्र राज्यातील आहे. त्यामधील पुण्याच्या औंध परिसरातील असणारी मृणाली जोशी (Mrinali Joshi) (वय. 24) या युवतीने घवघवीत यश संपादन केलं आहे. मृणाली ही भारतात 36 वी तर महाराष्ट्रात प्रथम आली आहे. आपल्या यशाबद्दल तिने एक यशाची यशस्वी कसोटी सांगितली.

केंद्रीय सेवेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते.तसे माझे देखील होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले असून आता मला महिलांसाठी काम करायला निश्चित आवडेल.
असं मृणाली जोशीने म्हटलं आहे. मृणाली सांगते की, माझं 1 ली ते 10 वी पर्यंतचं शिक्षण अभिनव इंग्लिश मीडियममध्ये झालं.
नंतर पुढं फर्ग्युसन काॅलेजमध्ये 12 वी विज्ञानमध्ये झालं. मला पुढे इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रात जायचे नाही. असं ठरवलं होतं.

बी.ए. अर्थशास्त्र शिक्षण पुर्ण केलं आणि केंद्रीय सेवेत (UPSC Result) जाण्यास सुरुवात केली.
बीएच्या पहिल्याच वर्षी निश्चित हे निश्चित केलं होतं.
आई-बाबांना कल्पना देखील दिली. मला प्रोत्साहन मिळालं त्याचं. खऱ्या अर्थाने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.
प्रथम प्रयत्नात मला यश मिळाले नाही.
मात्र दुसर्‍या प्रयत्नात यश मिळालं. पहिल्या प्रयत्नात अपयश का आले, त्याची कारणे शोधून त्यावर काम केलं.
मी दररोज 8 तास अभ्यास आणि इतर वाचन करण्यावर भर दिला.
मी सोशल मीडियापासून लांब राहिले. असं मृणाली (Mrinali Joshi) म्हणाली.

 

पुढे मृणाली म्हणाली, स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थीवर्गाची संख्या मोठी आहे. या परिक्षेत उत्तीर्ण न झाल्यास तो विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलायच्या घटना घडल्या आहेत.
या घटना लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून जाऊ नये. त्यांनी पुढील परिक्षेची निश्चित तयारी करावी. पण टोकाचे पाउल उचलू नये.
यश मिळवण्यासाठी हे एकच क्षेत्र नाही.
इतर क्षेत्रात देखील आपण यशस्वी होऊ शकतो. असही तिने सांगितलं.

 

Web Title : UPSC Result | upsc 36th ranker and topper from maharashtra mrunali joshi shares the secret of her success

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Raosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत दाखवला आपल्या अंगावरचा फाटका शर्ट; म्हणाले…

Personal Loan On Aadhaar Card | कोरोनाने केले बेरोजगार ! ‘या’ पध्दतीनं करा आधार कार्डद्वारे पर्सनल लोनसाठी अर्ज; जाणून घ्या

IIT Bombay Recruitment 2021 | आयआयटी मुंबईत ‘या’ पदांसाठी होणार भरती; 1 लाख रूपयांपर्यंत पगार