UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – UPSC Success Story | म्हणतात ना अपयश हा गुन्हा नसून स्वत: ला कमी लेखने हा सर्वात मोठा गुन्हा आहे. असाच एक तरूण स्वत:ला कमी न लेखता स्वप्नांचा नाही तर ध्येयाचा पाठलाग करुन यश खेचुन आणलं आहे. तो यश मिळवणारा तरुण म्हणजे केरळ (Kerala) येथील श्रीनाथ (Srinath) हा आहे. रेल्वे स्टेशनवर हमालाचे काम करणारा श्रीनाथ सध्या आयएएस अधिकारी (IAS Officer) बनला आहे. (UPSC Success Story)

‘माझ्यासमोर जी काही आव्हाने आली, ती आव्हाने मी संधी म्हणून पाहिली. तयारी दरम्यान विविध विचार आले. परंतु, मला यूपीएससी पास (UPSC Exam) करण्याची भूक होती जी चौथ्या प्रयत्नात पूर्ण झाली, असं श्रीनाथने (Srinath) सांगितलं आहे. आपलं ध्येयं गाठत यश संपादन केलं आहे. श्रीनाथची जास्त फी भरण्याची ऐपत नव्हती. त्याने कसेतरी स्मार्टफोनची व्यवस्था केली आणि आयएएसची तयारी सुरू केली. अतोनात मेहनतीतून श्रीनाथने केरळ लोकसेवा आयोगाची (Kerala Public Service Commission) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, इतक्यावर थांबला नाही तर काही काळानंतर श्रीनाथने आयएएसची तयारी सुरू केली आणि चौथ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा दिली. आणि यश खेचुन आणलं आहे. (UPSC Success Story)

 

दरम्यान, श्रीनाथ आयएएस होण्यापूर्वी ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हमाल म्हणून काम करायचा. कौटुंबिक खर्च भागवण्याइतपत मिळकत नसल्याने तो दुहेरी शिफ्टमध्ये काम करू लागला. तरी देखील अडचणी नेहमी सोबत राहिल्या परंतु तो थांबला नाही. प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे स्वप्न मनाशी बाळगत यश मिळवले, खरं तर त्यावेळी अभ्यासासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती.

Web Title :- UPSC Success Story | upsc exam kerala railway station porter srinath become ias officer UPSC Success Story

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | पोलीस अधिकाऱ्याची थेट 234 किलोमीटर सायकल स्वारी; फिटनेसबाबत संदेश देत ‘देहू ते पंढरपूर’ वारी

PM kisan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला दरवर्षी 6000 बरोबर 36000 रुपये मिळतील, तात्काळ करा ‘हे’ काम

Pimpri Corona | चिंतेत वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Benefits Of Tulsi | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी हिवाळ्यात तुळशीचे सेवन होऊ शकते परिणामकारक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलियोमधून हटवला ‘हा’ स्टॉक, 1 वर्षात दिला शानदार रिटर्न, जाणून घ्या कारण