‘टॉपर’ CA ने लाखो रूपयांची नोकरी साेडली, पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, दिल्या सक्सेस ‘टिप्स्’

नवी दिल्ली : पोलीसनामा – आपल्याकडे पाच-सहा वर्ष अभ्यास करुनही स्पर्धा परिक्षेत इच्छित यश मिळत नाही. त्यातून काही जणांना नैराश्य येते. मात्र चार्टर्ड अकाउंटंट असलेला दिल्लीच्या एका अवलियाने लाखोंची नोकरी सोडली आणि केंद्रिय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविळे. त्याच नाव केशव गोयल असे आहे. युपीएससी परिक्षेत त्याने २१३वा क्रमांक मिळविला.

गोयल यांनी सांगितले की, सीएच्या परिक्षेत अठराव्या क्रमांकावर आल्याने खुप खुष होतो. पण आयुष्याचा योग्य मार्ग मिळत नव्हता. त्यानंतर काही दिवस आत्मपरिक्षण केले. दरम्यान, जपानमधून मोठ्या रकमेच्या नोकरीची संधीही आली होती. इंटरव्ह्यूसुद्धा पास झालो होतो. पण एकदा मनात विचार आला. ज्या देशात आपण शिकलो. तो देश सोडून बाहेर जाणे इतके सोपे आहे का ? आज देशात शिक्षण आणि इतर क्षेत्रात काम करण्याच्या इतक्या संधी असताना मी ही समाजसेवेचेच एखादे क्षेत्र निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे मी युपीएससी करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाला लागलो. केंद्रिय लोकसेवा आयोग यामध्ये लोकसेवा हा शब्द असल्याने आपण जनतेचे सेवक असल्याची जाणीव करुन देत राहिल.

गोयल यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी परिक्षेत यश मिळविण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. त्या प्रत्येकाने आत्मसात करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

युपीएससी परिक्षेत यश मिळविण्यासाठी सर्वात आधी स्वंयप्रेरित असणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्मविश्वासही असावा लागतो. तुम्हाला अभ्यास करताना कोणी या पुस्तकातून तर कोणी त्या पुस्तकातून अभ्यास करण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही ते स्वतः ठरवायचे असते की आपण जे वाचत आहोत ते बरोबरच आहे. माझ्या कोणत्या तयारीने माझे मार्क जास्त येणार आहेत. त्या तयारीवर भर द्यायला हवा. कॉमर्सवाले सीए करण्याचा पर्याय निवडतात. पण लोकसेवेच्या क्षेत्रात तुम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळणार असते.

साधारणपणे एका मनुष्याचे वय सत्तर वर्षापर्यंत असते. आता हे आपल्यावर निर्भर असते की ते आपण किती अर्थपुर्ण आयुष्य जगत आहोत. त्यामुळे मीही भारतात राहून देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –