‘टॉपर’ ‘इरा सिंघल’नं सांगितलं IAS च्या मुलाखतीचं गुपित जे सर्वांच्या कामाला येईल, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आएएस एक नोकरी किंवा करिअर नसून स्वप्न आहे. इरा सिंघल या दिव्यांग असूनही UPSC परीक्षेत टॉप करणाऱ्या थोडक्या व्यक्तींमधील एक आहेत. २०१४ मध्ये तीने UPCS ची परीक्षा दिली. त्यात ती पास झाली. लेखी परीक्षेनंतर येणारी मुलाखत अनेक लोकांसाठी अवघड टप्पा मानला जातो. मुलाखतीला कसे सामोरे जायचे हे तीच्याच शब्दांत जाणून घेऊया.

मेरठ येथे जन्मलेल्या इरा सिंघल ही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत, तिने आएएस परिक्षेत टॉप करुन हे सिद्ध केले की, जिद्द चिकाटी असेल तर यश मिळतेच. इरा म्हणते की, जर तुम्ही आएएस च्या परिक्षेची तयारी करत असाल तर पहिली गोष्ट जाणून घ्या की, तुम्ही जसे समजता किंवा तुम्हाला जे करुन दाखवायचे आहे. अगदी तसेच मुलाखत पण तुम्हाला पारखते. त्यामुळे मुलाखतीसाठी सावध रहा.

इराने मुलाखतीत सांगितले आहे की, दिव्यांग लोक जर आएएसच्या परिक्षेची तयारी करत असेल तर त्यांनी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यांनी स्वतःला कधीच दिव्यांग समजू नये. यामुळे त्यांना मुलाखतीमध्ये सोपे आणि वेगळे प्रश्न विचारले जातील.

दिव्यांग लोकांनी तयारी दरम्यान आपल्या मनातील भिती काढून टाकली पाहिजे. की, मुलाखतीमध्ये आपल्या शरीराच्या आधारावर काही प्रश्न विचारले जातील. मात्र ही मुलाखत आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर घेतली जाते.

ती पुढे म्हणते की, फक्त दिव्यांगच नाही तर सामान्य लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण जसा विचार करतो आपल्याला तसेच दिसते. जर तुम्ही मनातून सक्षम असाल तर तुमच्यामध्ये एक चांगला एडमिनिस्ट्रेटर बनण्याचे गुण आहेत. ती म्हणते की, मी माझ्या मनाला कधीच कमजोर केले नाही. हेच कारण आहे मी टॉप येण्याचे.

इराने स्वतःविषयी सांगितले की, ‘मी चौथीमध्ये होते तेव्हाच आएएस बनण्याचे ठरविले होते. मी लहानपणासापून ऐकायचे की, डिएम बदलले.  मला वाटायचे की, हे खूप मोठे आणि जबाबदारीचे पद आहे. मी कधी स्वतःला असे समजले नाही की, मी सामान्य लोकांपेक्षा कमी आहे. मी माझ्या मनात नेहमी असा विचार करत राहिले की, मला काहीतरी असे करायचे आहे ज्यामुळे लोकांना अभिमान वाटेल. त्यानंतर मी तयारी करु लागले. ‘

मी सिविल सर्विसेज देण्याचा विचार केला आणि आपल्या तयारीच्या आधीच माझे अटेंप्टमध्ये सिलेक्शन झाले पण जेव्हा मला समजले की, सर्विस एलॉटमेंटमध्ये माझे नाव नाही तेव्हा मला काही वाटले नाही पण माझ्या ऐकण्यात आले की, माझ्यासारखे अनेक पीडब्ल्यूडी (पर्सन विद डिसेबिलिटी) लोक होते ज्यांची नाव एलॉटमेंटमध्ये आले नव्हते. तेव्हापासून मी सरकारी नोकरीच्या भेदासाठी लढले आणि मला त्यामध्ये यश मिळाले.

ती म्हणते की, दिव्यांग व्यक्ती असो किंवा अन्य कोणी. आएएसची तयारी करणाऱ्यांनी सगळ्यात पहिले हे करायला हवे. त्यांनी स्वतःचे प्लॅनिग स्वतः  केले पाहिजे. आपण आपले स्वप्न पुर्ण केले पाहिजे. आपण तयारी करताना नॉलेज व्यतिरिक्त स्वतःला समजून घेतले पाहिजे.

महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

 

You might also like