Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

पोलीसनामा ऑनलाईन टीम : चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी OPPO ने काही दिवसांपूर्वी आपला 5G स्मार्टफोन Oppo Reno 5Pro 5G लाँच केला होता. भारतीय मार्केटमध्ये या फोनला ३५ हजार ९९० रुपयांत लाँच केले होते. मात्र आता या फोनवर ३५०० रुपयांची सवलत (Discount) दिली जात आहे. ही सवलत ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या मोबाइल बोनान्झा सेल वर दिली जात आहे. याशिवाय अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. Oppo Reno 5 Pro 5G शिवाय, Moto G 5G आणि iQOO 3 (5G) स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.

Oppo Reno 5 Pro 5G फोनवरील ऑफर-
८ GB रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३५ हजार रुपये आहे. यासोबत अनेक ऑफर्स दिली जात आहे. जर युजर्संना ICICI BANK कार्ड्सचा वापर केल्यास त्यांना ३५०० रुपयांपर्यंत सवलत (Discount) दिली जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयवर १२ महिन्यांपर्यंत ईएमआयवर फोन खरेदी करता येऊ शकतो. १ रुपयात कम्प्लिट मोबाइल प्रोटेक्शन ऑफर दिली जात आहे. फोनसोबत गॅरंटी दिली जात आहे. १२ महिन्यासाठी १२० GB क्लाउड स्टोरेज दिली जात आहे. या फोनसोबत १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

MOTO-G 5G वर ऑफर-
या फोनच्या ६ GB रॅम प्लस १२८ GB स्टोरेज व्हेरियंटला ६ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत २४ हजार ९९९ रुपयांऐवजी १८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. तर ICICI BANK कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट Access bank क्रेटिड कार्ड द्वारे ५ टक्के अनिलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. या फोनवर १६ हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

iQOO-3 5G वर ऑफर-
या फोनच्या १२ GB रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४६ हजार ९९० रुपये आहे. १२ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत हा फोन ३४ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकतात. ICICI BANK कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट Access bank क्रेडिट कार्ड द्वारे ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. नो कॉस्ट ईएमआय वर फोन खरेदी करू शकता. फोनसोबत १६ हजार ५०० रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.