कांद्यानंतर आता ‘डाळी’ महागल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांदे आणि टॉमेटोच्या किंमती वाढल्यानंतर आता सामान्यांच्या ताटात महत्वाच्या असलेल्या डाळी महागल्या आहेत. यामुळे डाळ खरेदी करणं समान्याच्या खिशाला न परवडणारे झाले आहे. यामुळे सरकार समोर देखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. तूर आणि उडीद डाळीच्या किंमती 100 रुपयांवर पोहचल्या आहेत. वाढत्या किंमती पाहून सचिवांच्या समितीने डाळीचा पुरवठा वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

कांद्याच्या वाढणाऱ्या किंमतीनंतर मागील आठवड्यात डाळींच्या किंमती 5 ते 6 रुपयांनी वाढल्या आहेत. उडीद डाळीची किंमत 100 रुपये प्रति किलो पार गेली आहे तर तूर डाळ 98 रुपये प्रति किलोच्या आसपास पोहचली आहे. मूग डाळ देखील 95 रुपये प्रति किलोच्या आसपास पोहचली. तर मसूर डाळ 72 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

सरकार उचलणार पाऊले –
डाळींच्या वाढत्या किंमतीमुळे सरकार पुढील समस्या वाढली आहे. यामुळे सचिवांच्या समितीने एक बैठक बोलावून घेतली. या समितीत सर्व निर्देश देण्यात आले ज्यामुळे डाळींचा पुरवठा वाढेल. पहिल्यांदा जितकी डाळीची आयात केली आहे त्यापेक्षा जास्त क्लियरंस देण्यात आला जेणेकरुन डाळी लवकरात लवकर बाजारात पोहचतील. दुसरे पाऊल हे असेल की NAFED स्थानिक बाजारात प्रोक्युरमेंट करण्यात येईल आणि गरज भासल्यास आयात करण्यात येईल. हे यासाठी देखील केले जाईल जेणेकरुन सरकारला 20 लाख टन डाळीचा बफर स्टॉक तयार करता येईल.

तिसरे पाऊल हे असेल तरी डाळीचा पुरवठा केंद्रीय भंडारातून वाढवता येईल. नाफेड केंद्रीय भंडरातून डाळींची पुरवठा वाढवण्यात येईल. तर चौथे पाऊल हे असेल की सरकार सर्व राज्य आणि केंद्र सरकारला सोबत घेण्याचा प्रयत्न करेल, जेथे पीडीएस म्हणजेच रेशनच्या माध्यमातून डाळींचा पुरवठा करण्यात येईल. ग्राहक मंत्रालय या सर्व प्रकरणाची निगराणी करेल जेणे करुन येणाऱ्या दिवसात डाळीच्या किंमती नियंत्रणात येतील.

Visit : Policenama.com