
Urad Dal | ‘या’ डाळीचा करा दैनंदिन डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या हृदयरोगापासून वाचण्याची सोपी पद्धत
पोलीसनामा ऑनलाइन टीम – उडीद डाळ (Urad Dal) खाणे बहुतेकांना आवडत नाही. ही डाळ खाणे अनेकांना कंटाळवाणे वाटते. परंतु उडीद डाळ खाण्याचे असंख्य फायदे आहेत. या डाळीचा आहारात समावेश का करावा ते जाणून घेवूयात. (Urad Dal)
उडीद डाळीचे 5 फायदे (Benefits Of Urad Dal)
उडीद डाळीमध्ये न्यूट्रीशनल व्हॅल्यू (Nutritional Value) खूप जास्त आहे. यात भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर असते. त्याच बरोबर आयर्न (Iron), प्रोटीन (Protein), पोटॅशियम (Potassium), मॅग्नेशियम (Magnesium) आणि व्हिटॅमिन बी (Vitamin B) देखील भरपूर प्रमाणात असते.
1. हाडांसाठी चांगली (Urad dal Is Very Beneficial For Bones)
काळ्या सालीची उडीद डाळ हाडांसाठी (Bones) खूप फायदेशीर आहे. उडीदची डाळ पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. ही डाळ खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.
2. हृदय निरोगी ठेवते (Urad Dal Keeps Heart Healthy)
उडदाच्या डाळी मध्ये पोटॅशियम असते, जे रक्तवाहिन्या (Blood Vessels) आणि धमन्यांमधील (Arteries) ताण कमी करते आणि हृदय निरोगी ठेवते.
3. वेदना आणि सूजमध्ये आराम (Relief In Pain And Swelling)
उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे वेदना आणि सूज कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तसेच स्नायू आणि सांधेदुखी कमी होते.
4. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी (Blood Sugar Level Control)
डाएटरी फायबरचे प्रमाण जास्त असल्याने उडीद डाळ ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
5. डायजेशनमध्ये गुणकारी (Effective In Digestion)
तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तरीही उडदाची डाळ तुम्हाला फायदेशीर ठरेल. यामध्ये विरघळणारे फायबर असते, जे पोषकतत्वे शोषून घेण्यास मदत करते आणि अघुलनशील फायबर बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या दूर ठेवते.
Web Title :- Urad Dal | urad dal health benefits for heart nutritional value diabetes pain blood sugar digestion bone
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update