बोगस कर्ज प्रकरणामुळेच अर्बन बँकेचा ‘एनपीए’ वाढला

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – वाढलेल्या ‘एनपीए’मुळे रिझर्व बँकेने लाभांश वाटपास मनाई केली. त्यामुळे सभासदांचे तब्बल ३ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे सभासदांची फसवणूक बँकेने केली आहे. अलीकडच्या काळात खा. दिलीप गांधी यांनी त्यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात बोगस कर्ज प्रकरणे केल्यामुळे ‘एनपीए’  वाढला आहे. फक्त 23 खातेदारांकडे 168 कोटी रुपयांचे कर्ज आहे, असा आरोप माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

हेही वाचा – डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला सेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा कडाडून विरोध 

गांधी म्हणाले, नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ३१ मार्च २०१० पर्यंतचे सभासदाना २५० रुपयांची ठेव पावती देण्याचे जाहीर केले. आपण सभासदावर खुप मोठे उपकार केले या अविर्भावात मिठाई वाटुन आनंदोत्सव केल्याचे फोटो व व्हीडीओ त्यांचा प्रसिध्द झाला. सोमवारी ( ४ मार्च) ला बँकेचे केडगाव शाखेत हा कार्यकम होत आहे. वास्तविक पाहता सभासदांचे शताब्दी भेट २०१० मध्येच देणे अपेक्षित होते व मागील संचालक मंडळाने तशी संपुर्ण तरतूद करुन ठेवली होती. व २०१० मध्ये सभासदांना २५० रुपये ठेव मिळणार होती. परंतु खा.दिलीप गांधी यांना ही रक्कम सभासंदाना वाटायची नव्हती. २०१० मध्ये बँक सुस्थितीत होती व रिझर्व बँकेची कोणतीही आडकाठी नव्हती. त्यावेळेस बँकेचा एन.पी.ए.फक्त ३० कोटी रुपये होता.

गांधी यांनी ही रक्कम जाणीवपूर्वक दाबुन ठेवली. आता ९ वर्षानंतर केवळ सभासंदाचे लक्ष विचलित करण्यासाठी सभासदांची फसवणुक करत आहेत. बँकेत काही सभासदांचे १-१ लाखाचे जादा शेअर्स आहेत. लाभांश न मिळाल्यामुळे त्यांचे तब्बल १५ हजारांचे नुकसान होणार आहे. गांधी त्यांना २५० रुपये देऊन खुप मोठा अविर्भाव करुन पेढे वाटत आहेत. लाखो रुपये खर्च करुन कार्यक्रम करीत आहेत. हा निर्लज्जपणचा कळस आहे. आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करीत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी वसंत लोढा, ऍड. अशोक बोरा, अच्युत पिंगळे मनोज गुंदेचा आदी उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like