Urfi Javed | राखी सावंतच्या अटकेनंतर उर्फी जावेदची पहिली प्रतिक्रिया चर्चेत; ‘नुकतेच राखीचे लग्न झाले….’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा (Sherlyn Chopra) आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याबद्दल राखी सावंत (Rakhi Sawant) हिला मुंबईतील अंबोली पोलिसांनी (Amboli Police, Mumbai) अटक केली होती. काल रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. आता या प्रकरणावर उर्फी जावेदने (Urfi Javed) प्रतिक्रिया देत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अनेक दिवसांपासून उर्फी जावेद ही चर्चेत होती. उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी आक्षेप नोंदवला होता. तर यांच्यातील वाद काही संपताना दिसत नव्हते. आता उर्फीने (Urfi Javed) केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

 

 

 

उर्फीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राखीच्या प्रकरणाबद्दल वक्तव्य व्यक्त केले. यावेळी बोलताना ती म्हणाली, “नुकतेच राखीचे लग्न झाले यासाठी मी खूप आनंदी आहे. ती लवकरच या अडचणीतून बाहेर पडेल अशीच प्रार्थना मी करते. तिला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा”. सध्या उर्फीचे (Urfi Javed) हे वक्तव्य सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.

तर काल राखीला आंबोली पोलिसांनी 833/2022 क्रमांकाच्या एफआयआर प्रकरणी अटक केली होती.
यासंबंधी रात्री उशिरापर्यंत तिची चौकशी करण्यात आली.
या आधी राखीने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) अर्ज केला होता मात्र न्यायालयांनी तो अर्ज फेटाळला होता.

 

 

 

Web Title :- Urfi Javed | actress urfi javed speaks about rakhi sawant marriage and arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा