Urfi Javed | उर्फी जावेदनं डेनिम जॅकेटवर लिहिला जबरदस्त संदेश म्हणाली – “मैरिटल रेप सुद्धा रेपचं आहे..!”

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed | सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. बिग बॉस ओटीटी मधून बाहेर आल्यानंतर उर्फीच्या प्रसिद्धीला चांगलंच उधाण आलं आहे. उर्फी सतत सोशल मीडियावर तिचे विचित्र कपड्यांचे फोटो आणि व्हिडिओ (Viral Video) शेअर करत असते.

 

उर्फी जावेदचा (Urfi Javed) एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्फीनं तिच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. परंतु नेहमीपेक्षा तिची ही स्टोरी थोडी वेगळी होती. नेहमी आपल्या कपड्यांनमुळं सतत ट्रोल होणाऱ्या उर्फीनं आता स्टोरीमध्ये नेटकऱ्यांसाठी आपल्या कपड्यामधून एक सुंदर असा संदेश दिला आहे.

 

शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिनं डेनिम जॅकेट घातला असून, ते कस्टमाईज केलं आहे. स्टोरी शेअर करून ती म्हणाली, “माझे जॅकेट म्हणतंय की, मैरिटल रेप सुद्धा रेपचं आहे.” स्टोरीवरून नेटकऱ्यांनी अंदाज बांधला की, ती रेपच्या पूर्ण विरोधात आहे. व्हायरल झालेल्या स्टोरीतील फोटोमध्ये उर्फीच्या जॅकेटमागं “मैरिटल रेप इस स्टील रेप” असं लिहिलं आहे.

 

दरम्यान, उर्फीनं नेहमी तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळं सोशल मीडियावर ट्रोल होत असते.
मात्र या वेळेत तिच्या या सुंदर संदेशामुळे ती ट्रोल होणार नसल्याचं म्हटलं जातंय.
परंतु तरीदेखील काही नेटकरी तिच्या या फोटोला ट्रोल करू शकतात.

 

Web Title :- Urfi Javed | bigg boss ott fame urfi javed share instagram story on marital rape

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा