Urfi Javed | FIR दाखल झाल्यानंतर उर्फीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली मी भारतात राहते…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून ट्रोल (Troll) देखील केले गेले. या ट्रोलरकडे दुर्लक्ष करत उर्फी नेहमी तिची क्रिएटिव्हिटी (Creativity) दाखवत असते. उर्फी (Urfi Javed) वेगवेगळ्या वस्तूंपासून ड्रेस बनवते. ती कधी कोणत्या वस्तू पासून ड्रेस बनवेल याचा काही नेम नसतो. आता पुन्हा एकदा उर्फी चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे तिचा ड्रेस नसून तिच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहे.

 

दिल्ली पोलीस स्टेशन (Delhi Police) मध्ये उर्फी जावेदवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. परंतु तक्रारदाराचे नाव अद्यापही समजले नाही. या तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे की, “झीनत अमानच्या (Jeenat Aman) ‘हाय हाय ये मजबुरी’ (Haye-Haye-Ye-Majburi) गाण्याच्या रिमेकमध्ये (Remake) उर्फीने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. उर्फी जावेदने (Urfi Javed) ज्या प्रकारचा मजकूर दिला आहे तो अतिशय चुकीचा आहे. लैंगिक सामग्री इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करणे म्हणजे लोकांच्या भावना दुखावणे आहे”. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आता उर्फी जावेदने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर ती म्हणाली, “हे माझ्यासाठी खूप विडंबनात्मक आहे.
हे तेच लोक आहेत जे माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात.
आता देशात लवकरच असे घडेल जेव्हा बलात्कार करणाऱ्या विरुद्ध इतक्या एफआयआर होणार नाही जेवढ्या आमच्या विरोधात होतील.
मी कशा पद्धतीचे ड्रेस परिधान करायला पाहिजे हा सर्वस्वी माझा अधिकार आहे. मी भारतात (India) राहते तालिबान (Taliban) किंवा अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये नाही.
यामुळे माझ्यावर कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही. मुलींनी काय परिधान करावे किंवा काय करू नये हा पूर्णतः त्यांचा निर्णय आहे.
उर्फीच्या या आत्मविश्वासाचे काही जण कौतुक करतात तर काही तिला वाईट रित्या ट्रोल (Troll) देखील करतात.

 

Web Title :- Urfi Javed | fir against internet sensation urfi javed for jeenat aman song haye haye ye majburi remake

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण