Urfi Javed Viral Video | रस्त्याच्या कडेला गुटाखा खाल्लेल्या व्यक्तीनं सेल्फी काढण्यासाठी उर्फी जावेदसोबत केली जबरदस्ती, व्हिडिओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आहे. आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करून उर्फी चर्चेत राहण्यासाठी कोणता बहाना सोडत नाही. मात्र ऊर्फी सध्या एका वेगळ्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. उर्फीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) तिचा हॉट किंवा बोल्ड नसून एक गमतीदार रोडवरील घटनेचा आहे.

 

उर्फीचा व्हायरल झालेला व्हिडिओ एका हॉटेल बाहेरील आहे. या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Viral Video) एक अज्ञात इसमजवळ येतो आणि तिला पकडून सेल्फी घेण्यास जबरदस्ती करतो. त्या व्यक्तीच्या तोंडात पूर्णपणे गुटखा असून, सर्वप्रथम तो जेव्हा तिच्या जवळ सेल्फी घेण्यात येतो तेव्हा उर्फी थोडी लांब होते. मात्र नंतर तो बाजूला आपल्या तोंडात भरलेला गुटखा थुंकतो. आणि तिला फोटोसाठी जबरदस्ती करतो. मात्र तिला त्याचं वागणं बघून हसू फुटतं.

 

 

उर्फी जावेदनं या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच फाटका शॉर्ट ड्रेस घातला आहे. पायामध्ये गुलाबी रंगाची हाय हिल्स घातलीये. हा व्हिडीओ विरल भयानीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 109 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दरम्यान, उर्फीबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ प्लॅटफॉर्ममधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
अलीकडेच तिचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. तसेच नुकतंच तिनं पंजाबी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले असून,
तिचा एक पंजाबी म्युझिक व्हिडिओसुद्धा प्रदर्शित (Urfi Javed Latest Punjabi Song ) झालाय. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

 

 

 

Web Title :- Urfi Javed Viral Video | a man eating gutkha on roadside caught urfi javed and took selfie see video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget-2022 | काय स्वस्त, काय महाग? ‘महाबजेट’ नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार; जाणून घ्या

 

Blood Sugar | कोणते पदार्थ वाढवतात ब्लड शुगर आणि कोणते कमी करतात? येथे पहा यादी

 

PMC Draft ward Structure | पुणे महानगरपालिका : प्रभाग रचनेचा नकाशा अधिकृतरित्या जाहीर, अनेकांच्या नगरसेवकपदाच्या ‘आकांक्षा’वर ‘पाणी’?; जाणून घ्या 58 प्रभागांतील मतदार संख्या

 

PMC Draft ward Structure | 34 गावांचा समावेश आणि त्रिसदस्यीय प्रभागामुळे अनेक विद्यमान ‘डेंजर झोन’ मध्ये