अर्जंट ब्रेक’ने घेतला शाळकरी मुलाचा बळी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मित्रांसोबत विद्यापीठ परिसरातील हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या शाळकरी मुलाने समोरच्या वाहनाने अचानक वेग कमी केल्याने अर्जंट ब्रेक दाबला. यामुळे झालेल्या अपघातात दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी लोखंडी पुल ते महावीर चौकादरम्यान झाला. या अपघाताची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

उर्वेश सुभाष जुमडे (रा. राजमाता जिजाऊ नगर) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वेश आणि त्याचा मित्र जयेश नरवडे, प्रतीक आठवले आणि आकाश सोनार हे सिडको येथील एका इंग्लीश स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत आहेत. सकाळी हे चार मित्र दोन दुचाकीवरून विद्यापीठ परिसरातील हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी जात होते.

चारही मित्र दुचाकीवरून गप्पा मारत जात होते. त्यावेळी समोरील वेगात जाणाऱ्या बस चालकाने अचानक वेग कमी केला. त्यामुळे आपण दुचाकीला धडकू शकतो या भितीने उर्वेशने अर्जंट ब्रेक दाबला. त्यामुळे उर्वेश आणि त्याचा मित्र खाली पडले. उर्वेश दुचाकीखाली दबला गेला तर त्याचा मित्र लांब फेकला गेल्यामुळे त्याला थोडे लगले. या अपघातात दुर्वेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान पाठिमागून वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनल गायकवाड जात होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यानंतर उर्वेशला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारार्वीच मृत्यू झाला.

आरोग्य विषयक वृत्त –

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ