‘उरी’ फेम विकी कौशलचा लहानपणीचा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाई उरी द सर्जिकल स्ट्राईक फेम अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून सोशलवर चर्चेत आहे. विकी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अनेकदा तो आपले फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसाठी शेअर करत असतो. नुकताच विकीने शेअर केलेला त्याचा एख फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विकीने शेअर केलेला हा फोटो त्याचा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोमुळे विकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

Post shave look…

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

विकी कौशल त्याच्या लहानपणीच्या फोटोमध्ये सहज ओळखूही येत आहे. त्याचा आताचा आणि लहान असतानाचा चेहरा यात खूप काही फरक नसल्याचे दिसत आहे. उरी सिनेमा केल्यानंतर विकी कौशल प्रकाशझोतात आला. या सिनेमाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली.

हाऊज द जोश हा या सिनेमातील डायलॉग विशेष गाजल्याचे दिसून आले.

नकुतीच विकी कौशलसोबत दुर्घटना घडल्याचेही समोर आले. शुटींग दरम्यान एका अपघातात विकीच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

😬+🤦🏼‍♂️= ☝🏽

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

या अपघातात विकीच्या चेहऱ्याला 13 टाके पडले आहेत. त्याच्या या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांना याबाबत वाईट वाटले आहे.

Loading...
You might also like