आता ‘उरी’ चित्रपटचे ‘या’ तीन भाषांमध्ये येणार रिमेक

मुंबई : वृत्तसंस्था – सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ चित्रपट प्रेक्षकांसह बॉलिवूडच्या कलाकारांनाही चांगलाच पसंत पडला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असून चित्रपटाने १०० कोटी कमावल्यानंतर येत्या काही दिवसात चित्रपट १५० कोटी कमवणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हिंदी भाषेत चित्रपट हिट ठरल्यानंतर आता निर्मात्यांनी हा चित्रपट तीन भाषेमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिणेकडील तमिळ, तेलगू आणि मल्याळम या तीन भाषामध्ये रिमेक केला जाणार आहे. चित्रपटाचे निर्माता रॉनी स्क्रूवाला यांना दाक्षिणेकडीन अनेक निर्मात्यांचे फोन आले असून त्यांनी याचा रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे विक्रीमुल्यही वाढले आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथे हल्ला केल्यानंतर बदला घेण्यासाठी २०१६ मध्ये हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानत घुसून कारवाई केली होती. यावर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट आहे. चित्रपटात विकी कौशल याने प्रमुख भूमिका केली आहे. याशिवाय चित्रपटात मोहीत रैना, परेश रावल, यामी गौतम यांचीही प्रमुख भूमिका आहे.