Uric Acid And Vitamin C Deficiency | ‘विटामिन-सी’च्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते यूरिक अ‍ॅसिडची समस्या, ‘या’ वस्तूंचा आजच करा आहारात समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uric Acid And Vitamin C Deficiency | खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Wrong Eating Habits) बहुतांश लोक अनेक आजारांना बळी पडत आहेत. ज्यामध्ये मधुमेह (Diabetes) व्यतिरिक्त, बहुतेक लोकांमध्ये आढळणारा आजार म्हणजे यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid). प्युरीन्स नावाच्या घटकाचे शरीरात विघटन होते तेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिड तयार होते. जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण (Uric Acid Level) वाढते तेव्हा आरोग्याच्या इतर अनेक समस्या (Health Problems) निर्माण होतात (Uric Acid And Vitamin C Deficiency).

 

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) महत्त्वाची भूमिका बजावते (Vitamin-C Deficiency). हे केवळ यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करत नाही तर शरीराला इतर अनेक आरोग्य फायदे देखील प्रदान करते.

 

अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे की व्हिटॅमिन सी रक्तातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे गाउट रोग रोखण्यास मदत होते (Uric Acid And Vitamin C Deficiency).

 

1. टोमाटो सूप – Tomato Soup
यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आंबट गोष्टींमध्ये व्हिटॅमिन सी असते. टोमॅटो चवीला आंबट असतो. सूप किंवा टोमॅटोचा ज्यूस (Tomato Juice) काढल्यानंतर तुम्ही तो पिऊ शकता. यामुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण नियंत्रित राहते.

 

2. लिंबूपाणी – Lemonade
लिंबू पाणी शरीरातील यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हे युरिक अ‍ॅसिडचे विघटन करण्यास मदत करते. हे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात बनवून प्या. त्यात चवीनुसार काळे मीठही घालू शकता.

3. संत्र्याचा ज्यूस – Orange Juice
संत्र्याचा ज्यूस युरिक अ‍ॅसिडची वाढलेली पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करतो. हे रोज प्यायल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित राहते आणि गाउटची समस्या होत नाही.

 

4. बेरी – Berry
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी (Strawberries, Blueberries, Raspberries) यांसारख्या बेरीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि
अँटीऑक्सिडंट (Antioxidant) आढळतात, जे शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करतात.
याव्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन सी आणि फायबरचे (Fiber) प्रमाण जास्त आहे.

 

याच्या सेवनाने सांधेदुखी (Joint Pain), सूज (Swelling) आणि इतर समस्या होत नाहीत.
याशिवाय उच्च कोलेस्ट्रॉल पातळी (Cholesterol Level), उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्याही याच्या सेवनाने कमी होते.
त्यामुळे बेरीचे सेवन जरूर करा.

 

5. किवी – Kiwi
किवीमध्ये व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात असते ज्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळते आणि यूरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
याशिवाय जर तुम्ही दररोज किवीचे सेवन केले तर युरिक अ‍ॅसिडची लक्षणेही कमी होऊ शकतात.

 

6. सफरचंद व्हिनेगर – Apple Vinegar
अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.
यासाठी रोज एक ग्लास पाण्यात 1 ते 2 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) प्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid And Vitamin C Deficiency | uric acid vitamin c deficiency also increases uric acid complete this deficiency with these foods

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Juices For Kidney Stones | किडनी स्टोनच्या समस्येत उपयोगी आहेत ‘हे’ 3 ज्यूस, आजपासूनच डाएटमध्ये करा समावेश

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Fenugreek Seeds Health Benefits | मेथीच्या दाण्यांचे आश्चर्यकारक फायदे, हृदय आणि मधुमेहासाठी वरदान; जाणून घ्या