जास्त उपवासाने वाढते युरिक अ‍ॅसिड, ‘या’ 9 उपायांनी ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या महत्वाची माहिती

पोलिसनामा ऑनलाइन – शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे वारंवार उपवास करणे हे आहे. शरीरातील युरिक एसिड मुत्राद्वारे बाहेर पडत असतं. पण युरिक अ‍ॅसिड मुत्राद्वारे योग्य प्रमाणात बाहेर पडलं नाही तर शारीरिक समस्या होऊ लागतात. यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. हाय प्रोटीन्स फुड जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढतं. काहीवेळा किडनी खराब असल्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड योग्य प्रमाणात बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. तसेच मधुमेहामुळेही शरीरातील युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं.

युरिक अ‍ॅसिड असे ठेवा नियंत्रणात

1 चटपटीत पदार्थ, भाजलेले पदार्थ, जंक फूड, सोया मिल्क अशा पदार्थांचे सेवन टाळा.

2 प्यूरिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश कमी करा. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित राहील.

3 गुळवेलाच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते. यामुळे रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

4 आहारात फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करावा.

5 चांगली झोप घ्या.

6 नियमीत व्यायाम करा.

7 जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायला हवे.

8 प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका.

9 संत्र्यामध्ये व्हिटामीन सी, पोटॅशियम, फ्लेवोनॉइड्स असल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड बाहेर पडते आणि शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.