शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्यानं होऊ शकतात गंभीर आजार ! कारणांसहित जाणून घ्या उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर शरीरात प्युरीनचं प्रमाण वाढलं तर युरीक अ‍ॅसिडचं प्रमाणही वाढतं. यामुळं गंभीर समस्या उद्भवू शकतात. शरीर किडनीच्या मदतीनं युरिक अ‍ॅसिड फिल्टर करण्याचं काम करत असतं. प्युरीनचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं तर शरीराला हे अ‍ॅसिड फिल्टर करण्यास बाधा येते. अशा स्थितीला Hyperuricemia असं म्हटलं जातं. यामुळंच सांधेदुखीची समस्या येते. आज आपण हे अ‍ॅसिड वाढण्याची कारणं आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेत हे जाणून घेणार आहोत.

युरिक अ‍ॅसिड वाढण्याची कारणं पुढीलप्रमाणे –

मांसाहार, भात, पनीर, राजमा यांचं जास्त सेवन
लठ्ठपणा
अनियमित आणि चुकीच्या आहाराचं सेवन
डायबिटीजच्या रुग्णांमध्ये ही समस्या जास्त आढळते.

युरिक अ‍ॅसिड म्हणजेच सांधेदुखी हा त्रास साधारणपणे 30 वर्षांच्या पुढील लोकांमध्ये होतो. युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर शरीरात गाठीसारखं जमा होण्यासही सुरुवात होते जे इतर भागातही वेगानं पसरतं.

काय आहेत यावरीलव उपाय ?

1) प्युरीनयुक्त पदार्थ – युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण नैसर्गिकपणेही कमी केलं जाऊ शकतं. यासाठी जे प्युरीनयुक्त पदार्थ आहेत त्यांचा आहारातील समावेश कमी करा. यामुळं पचनक्रिया व्यवस्थित राहते.

2) दिवसा झोपणं टाळावं – ज्या लोकांना युरिक अ‍ॅसिडचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दिवसा झोपणं टाळायला हवं.

3) साखरयुक्त पदार्थांचं सेवन – जर तुम्हाला ही समस्या असेल तर साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा. कोल्डड्रींक्स, फ्रेश फ्रुट ज्यूस यात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असतं. रिफाईन्ड आणि पॅकेजिंगवाल्या पदार्थांमुळं रक्तातील साखरेचं प्रमाण आणि युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं.

4) भरपूर पाणी प्यावं – भरपूर पाणी पिल्यानं शरीरातील युरिक अ‍ॅसिड वेगानं बाहेर पडण्यास मदत होते. शक्यतो गरम(क्षमतेनुसार) पाण्याचं सेवन करावं.

5) गुळवेलाचे सेवन – गुळवेलाच्या पानांच्या भाजीमुळं युरिक अ‍ॅसिडसोबतच इतरही अनेक उपद्रवात्मक त्रास कमी होतो. रक्त शुद्ध होतं, वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळं याचं सेवन करणं लाभदायक आहे.

6) फायबर्सयुक्त पदार्थ – आहारात फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश फायदेशीर ठरतो.

7) झोप – शरीलाला 7 ते 8 तास झोप गरजेची आहे. झोपेच्या 2 ते 3 तास आधी स्क्रीन पासून दूर रहा.

8) व्यायाम – व्यायामानं तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता आणि तंदुरुस्त दिसण्यास आणि राहण्यास याची मदत होते.

9) हे पदार्थ कमी खा – या समस्येपासून बचाव करण्यासाठी मांसाहार तसेच अंडी कमी खा. राजमा आणि मशरून यांचंही सेवन कमी करायला हवं.