Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास उपयोगी ठरू शकतात ‘ही’ होमिओपॅथी औषधे, घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरीरात युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) चे प्रमाण वाढल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. शरीरातील प्युरीन (Purine) नावाच्या घटकाचे विघटन झाल्याने युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण (Uric Acid Level) वाढते. मात्र, बहुतेक यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) लघवी आणि मलविसर्जनातून बाहेर पडते. पण जेव्हा त्याचे प्रमाण शरीरात वाढते, तेव्हा हे अ‍ॅसिड हळूहळू हाडांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे आर्थरायटिस (Arthritis) म्हणजेच संधिवात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे लहान वयातच गुडघेदुखी (Knee Pain), उठायला-बसायला त्रास, सांधेदुखीचा (Joint Pain) त्रास होतो.

 

युरिक अ‍ॅसिडची लक्षणे (Uric Acid Symptoms) :

हात-पायांमध्ये जळजळ

बोटांमध्ये असह्य वेदना

सांधेदुखी, जळजळ

छातीत जळजळ

अन्न खाण्यात त्रास होणे त्यामुळे सूज येणे

हाडांमध्ये दुखणे

लघवी करण्यास त्रास

लवकर थकवा येतो

 

यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) कमी करण्यासाठी बहुतेक लोक अ‍ॅलोपॅथिक औषधे (Allopathic Medicines) वापरतात. मात्र, आरोग्य तज्ञांच्या मते, होमिओपॅथी औषधे (Homeopathic Medicines) देखील यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. होमिओपॅथिक उपाय यूरिक अ‍ॅसिडचे मेटाबॉलिज्ममध्ये (Metabolism) बदलून, यूरिक अ‍ॅसिडचे गठण आणि स्फटिकीकरण कमी करते, ज्यामुळे सूजेला प्रतिबंध होतो.

 

शरीरात तीव्र वेदना, थंडीमध्ये वेदना, हाताला पिन किंवा सुई टोचल्यासारखे वाटणे, बोटांमध्ये कडकपणा, शरीरात अशक्तपणा आणि मुंग्या येणे, सांधे जड होणे, अंगड्याला सूज येणे, टाच दुखणे, पायांना सूज येणे, थंडी वाजून येणे, पाठदुखी इत्यादी लक्षणांमध्ये कोलचिकम आटमनेल (Colchicum Autumnale) औषध दिले जाते. त्याचे सामान्य नाव मीडो सॅफरन (Meadow Saffron) आहे.

 

गाउटशी संबंधित एक्झिमा (Eczema), लिपोमा (Lipoma) म्हणतात, सतत होत असेल तर युरिकम अ‍ॅसिडम (Uricum Acidum) किंवा लिथिक अ‍ॅसिड (Lithic Acid) औषधाचा वापर करावा.

 

गाऊटच्या वेदना, सांधे सुजणे, उजव्या खांद्यामध्ये तीव्र वेदना, सांध्यात अवाज येणे, हालचाल करण्यात अडचण, वातरोग संबंधी ग्रंथी, सुजलेली बोटे, खालच्या भागात वेदना, पायाच्या टाचेत चमक, अशी लक्षणे असल्यास लिडम पॅलस्टर (Ledum Palustre) औषध दिले जाते.

 

मात्र, हे औषध शरीरातील अंतर्गत उष्णता कमी असलेल्या लोकांसाठी प्रभावी आहे. मात्र लक्षात ठेवा की तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध वापरू नका.

युरिक अ‍ॅसिडसाठी रामबाण उपाय कोणता (Treatment For Uric Acid)?
हाय फायबर फूड (High Fiber Food) जसे की, ओटमील (Oatmeal), दलिया, बीन्स (Beans), ब्राऊन राईस (Brown Rice)
खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात शोषले जाईल आणि त्याची पातळी कमी होईल.
बेकिंग सोड्याच्या (Baking Soda) सेवनाने सुद्धा युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत होईल.
यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. आता या मिश्रणाचे रोज 8 ग्लास प्या.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid | gout problem homeopathic medicines can be effective in increasing uric acid keep these things in mind before taking

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Diet Plan | लसूण डायबिटीजच्या रूग्णांसाठी ‘रामबाण’, शुगर लेव्हल करतो नियंत्रित

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! भाजपचा ‘हा’ नेता येणार अडचणीत ?

 

Pune Crime | 45 वर्षीय ‘चाचा’कडून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार