Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने वाढू शकतो किडनी स्टोनचा धोका, डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्याच्या सवयींमुळे (Eating Habits) यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) वाढण्याची समस्या उद्भवू शकते. शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण (Uric Acid Level) वाढल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. यूरिक अ‍ॅसिडच्या (Uric Acid) वाढीव पातळीमुळे सांध्याजवळ क्रिस्टल्स (Crystals) तयार होतात ज्यामुळे गाउट (Gout) नावाचा वेदनादायक आजार होऊ शकतो.

 

युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) वाढल्याने किडनी स्टोनचा धोका (Risk Of Kidney Stone) वाढू शकतो. स्थिती गंभीर असल्यास, किडनी निकामी (Kidney Failure) देखील होऊ शकते. युरिक अ‍ॅसिडची तपासणी (Uric Acid Test) वेळेत करून घेणे महत्त्वाचे आहे.

 

यूरिक अ‍ॅसिडची लक्षणे (Symptoms Of Uric Acid)

1. युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधे दुखतात (Joint Pain)

2. उठता-बसताना त्रास होणे

3. बोटांना सूज येणे (Finger Swelling)

4. सांध्यांमध्ये गाठ (Rheumatoid Nodules)

5. हाता-पायांच्या बोटांमध्ये वेदना

6. लवकर थकवा (Fatigue) जाणवू लागतो.

 

शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी किती असावी (Uric Acid Levels) :
पुरुषांच्या शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण 3.4 ते 7 mg/dL आणि स्त्रियांमध्ये 2.4 ते 6 mg/dL असते. शरीरातील अतिरिक्त यूरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यासाठी, अधिक द्रव पदार्थ (Liquids) आणि पाण्याचे (water) सेवन करणे आवश्यक आहे. आहारात काही फळे (Fruits) आणि भाज्यांचे (Vegetables) सेवन करूनही युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवता येते.

1. चेरी, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीचे सेवन करा (Eat Cherries, Blueberries And Strawberries) :
मेरीलँड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी (Antioxidant Properties) युक्त चेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि बेरीचे (Berry) सेवन केल्याने यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित (Uric Acid Control) राहते. गडद फळांमध्ये अँथोसायनिन्स (Anthocyanin) नावाचे फ्लेव्होनॉइड्स (Flavonoid) असतात जे सूज आणि आखडणे कमी करण्यास मदत करतात.

 

2. टोमॅटो आणि सिमला मिरचीचे सेवन करा (Eat Tomato And Bell Pepper) :
गडद रंगाच्या भाज्या जसे की, टोमॅटो आणि सिमला मिरची देखील यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहेत. सिमला मिरची आणि टोमॅटो सारखे अल्कधर्मी पदार्थ (Alkaline Substances) शरीरातील अ‍ॅसिडचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करतात.

 

3. ओट्स, केळी आणि धान्ये खा (Eat Oats, Bananas And Grains) :
ओट्स, केळी, ज्वारी आणि बाजरीसारखी धान्ये विरघळणारे फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. जी यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडने (University of Maryland) केलेल्या याच अभ्यासात असेही म्हटले आहे की, आहारात अधिक फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित ठेवता येते.

जास्त प्रमाणात फायबर (Fiber) असलेले अन्न रक्तातील अतिरिक्त यूरिक अ‍ॅसिड शोषून घेते आणि ते शरीरातून काढून टाकण्यास मदत करते.

4. सफरचंद नियंत्रित करेल यूरिक अ‍ॅसिड (Apples Control Uric Acid) :
रोज एक सफरचंद खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित राहते. सफरचंद मॅलिक अ‍ॅसिडने (Malic Acid) समृद्ध असते, जे रक्तातील यूरिक अ‍ॅसिडला प्रभावहीन करते.

 

5. संत्र्यामुळे नियंत्रित होते यूरिक अ‍ॅसिड (Oranges Control Uric Acid) :
संत्रे व्हिटॅमिन सीचा (Vitamin C) उत्कृष्ट स्त्रोत आहे जे यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. दररोज 500 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेतल्याने यूरिक अ‍ॅसिडची पातळी फार कमी वेळात कमी होते.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid | high uric acid may increase the risk of kidney stones include these foods in your diet to control it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 19 कार्यक्रम अन् 27 उद्घाटन

 

Chitra Wagh | ‘एकटा देवेंद्र काय करणार विचारणार्‍यांना पुन्हा एकदा करारा जवाब’ – चित्रा वाघ

 

Side Effects Tomatoes | टमाट्याचे दुष्परिणाम ! जास्त प्रमाणात टमाटे खाल्ल्याने होऊ शकतात 5 प्रकारचे आजार