Uric Acid | थंडी वाढल्याने वाढू शकते सांधेदुखीची समस्या, ‘या’ उपायांनी कमी करू शकता यूरिक अ‍ॅसिड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uric Acid | हिवाळा आल्हाददायक असल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. संधिवात, हृदयरोग किंवा हाडांचे आजार असलेल्या लोकांसाठी थंडीत ही समस्या होऊ शकते (Uric Acid). हिवाळ्यात काहींना हाडे दुखणे, सांधेदुखी, हात-पायांमध्ये मुंग्या येणे असे त्रास होतात. संधिरोग किंवा यूरिक अ‍ॅसिड वाढणे ही देखील काही लोकांमध्ये आढळणारी समस्या आहे. सांध्यांमध्ये युरिक अ‍ॅसिड साठल्याने सांधेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे हालचाल करणेही कठीण होते (Winter Health Problem).

 

युरिक अ‍ॅसिडची समस्या वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे असते. कारण वाढत्या वयानुसार हाडे आणि सांध्याशी संबंधित हा त्रास आणखीनच त्रासदायक होऊ शकतो. अशा लोकांना हिवाळ्यात पुन्हा-पुन्हा असा त्रास होत असल्यास त्यांनी काही भाज्या आणि थंड पदार्थ टाळावेत. युरिक अ‍ॅसिडचा त्रास होत असल्यास कोणते पदार्थ टाळावेत ते जाणून घेवूयात (Uric Acid) –

 

आरोग्यासाठी डॉक्टर नेहमी डाळी खाण्याचा सल्ला देतात. पण जास्त युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सालवाली डाळ खाणे टाळावे. डाळ आरोग्यासाठी चांगली असले तरी त्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढते आणि तीव्र वेदना होतात.

दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. पण, त्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते.
ट्रान्स फॅट शरीरासाठी हानिकारक असते. मांस आणि माशांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते.
यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. संधिरोगाचे प्रमाण वाढते. त्यामुळे हिवाळ्यात मांस आणि मासे खाणे टाळा.

 

हिवाळ्यात हिरवे वाटाणे खूप खाल्ले जातात. पण मटारमध्ये असलेले प्युरीन हानिकारक आहे.
त्यात प्रोटीनचे प्रमाणही जास्त असते. यामुळे सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येते.
त्यामुळे युरिक अ‍ॅसिडचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात मटार खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात.
तसेच हिवाळ्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करणे हानिकारक आहे. ज्या लोकांना युरिक अ‍ॅसिडची समस्या आहे
त्यांनी हिवाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid | the problem of arthritis may increase with increasing cold these measures can reduce uric acid

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Diet | थंडीत वाढू शकते ब्लड शुगर, कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश

Fasting Liquid | सणानंतर ‘या’ 5 देशी ड्रिंक्सने शरीर होईल डिटॉक्सिफाई

Cholesterol Control | थंडीत वाढले कोलेस्ट्रॉल तर ‘या’ 5 हेल्दी फॅट फूड्सने करा कंट्रोल