Uric Acid | महिलांमध्ये किती असावे यूरिक अ‍ॅसिड? पहा कंट्रोल करण्यासाठी चार्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) हे शरीरात बनवलेले विष आहे जे प्रत्येकाच्या शरीरात तयार होते. युरिक अ‍ॅसिड तयार होणे ही समस्या नाही, पण ते शरीरातून बाहेर न पडणे शरीराला आजारी बनवते. रेड मीट, सीफूड, काही मासे, पोल्ट्री उत्पादने, गोड पदार्थ यासारखे प्युरीनयुक्त पदार्थ आहारात घेतल्याने शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते. युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. सांधे दुखणे आणि सूज येणे, पायाची बोटे सुजणे, सांध्यांमध्ये गाठी येणे आणि बोटांमध्ये दुखणे ही युरिक अ‍ॅसिडची लक्षणे आहेत. (Uric Acid)

 

प्रश्न हा आहे की, रक्तात याचा किती स्तर उच्च मानला जातो. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, पुरुष आणि महिलांमध्ये यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वेगळे असते. 2.4 ते 6.0 6.0 mg/dL या श्रेणीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण स्त्रियांमध्ये सामान्य मानले जाते.

 

जर महिलांमध्ये यूरिक अ‍ॅसिड 6.0 mg/dL पेक्षा कमी असेल तर ते धोकादायक नाही. प्रत्येक माणसामध्ये, कमी-अधिक प्रमाणात यूरिक अ‍ॅसिड तयार होते, जे किडनी फिल्टर करते आणि शरीरातून काढून टाकते. जेव्हा हे विष शरीरात साचू लागते तेव्हा धोका वाढतो. महिलांमध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी किती असावी? वयानुसार चार्ट पहा. (Uric Acid)

महिलांमध्ये यूरिक अ‍ॅसिडची पातळी किती असावी?
स्त्रियांमध्ये सामान्य पातळी 1.5 ते 6.0 mg/dL असते. स्त्रियांमध्ये, जेव्हा यूरिक अ‍ॅसिडची पातळी 9.5 mg/dL पर्यंत पोहोचते तेव्हा ते शरीराचे जास्त नुकसान करू शकते. युरिक अ‍ॅसिडच्या या वाढीव पातळीमुळे किडनी निकामी होण्याचा धोका असतो, मुतखडा आणि रक्तदाब आणि साखरेचे आजार वाढू शकतात.

 

जर यूरिक अ‍ॅसिड वाढले असेल तर या फूड चार्टच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवा.

फळे आणि भाज्यांचे सेवन करा.
आहारात प्युरीन असलेले पदार्थ टाळा.
जास्त पाणी प्या.
रेड मीट, सीफूड टाळा.
सोया, पनीर, डाळ यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ टाळा.
जेवणात कमी चरबीयुक्त पदार्थ वापरा. जास्त चरबीयुक्त पदार्थ समस्या वाढवू शकतात.
दररोज अर्धा तास चाला किंवा व्यायाम करा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Uric Acid | what is the normal range of uric acid in women know the best foods to control it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diet Tips For Uric Acid | सर्वात बेस्ट आहे ‘या’ पीठाची भाकरी, ताबडतोब कमी होईल यूरिक अ‍ॅसिड, सांधेदुखीसुद्धा होईल दूर

 

Eggs And Cholesterol | अंडे हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवते का? जाणून घ्या कोणते फूड्स आजपासूनच डाएटमधून हटवले पाहिजेत

 

Pune Ring Road – Land Acquisition | रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरूवात