पुरुषांनो सावधान ! तुमच्या दाढीमुळे स्त्रियांना होतात ‘हे’ गंभीर आजार

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या अनेकजण दाढी ठेवताना दिसत आहेत. परंतु दाढी ठेवणारा प्रत्येकजण त्याची तेवढी स्वच्छता घेईलच असे नाही. त्यातही आजकाल जीवन खूप धावपळीचं झालं आहे. तुम्हीही या व्यक्तींपैकी असाल तर तुम्हाला माहिती आहे का याचा तुमच्या लैंगिक जीवनावरही होऊ शकतो. महिलांना अनेकदा युरीन इंफेक्शनच्या समस्या येतात. याची तशी तर अनेक कारणे आहेत. परंतु तुमची दाढीही याला कारणीभूत ठरू शकते. आता दाढी आण याचा नेमका संबंध काय आहे हे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात.

अनेकदा महिलांना फंगल इंफेक्शन होते याचे कारण म्हणजे त्यांचे ओले कपडे किंवा इतरही काही कारणं असू शकतात. फंगल इंफेक्शनमुळेही युरीन इंफेक्शन होऊ शकतं. योनी मार्गात बॅक्टेरिया वाढल्याने असे होते. परंतु याव्यतिरीक्त पुरुषांच्या दाढीमुळेही असे होऊ शकते. एका निरिक्षणातून समोर आलं आहे की, युरीन इंफेक्शन ज्या महिलांना झालं त्यांचे सर्वांचे पार्टनर दाढी राखणारे होते. आता तुम्हाला वाटत असेल की, दाढीचा आणि इंफेक्शनचा संबंध कसा ?

Beard

आजकाल सेक्सच्या बाबतीत लोकांमध्ये खूप फरक पडला आहे. आजकाल ओरल सेक्स तर कॉमन झाला आहे. अनेकदा नात्यात ओरल सेक्स होतोच. कारण युरीन इंफेक्शनमधील बॅक्टेरियाचा कोणता सोर्स असेल तर तो म्हणजे दाढी आहे. अभ्यासातून असे समोर आले आहे की, एका कुत्र्याच्या केसांमध्ये जेवढे बॅक्टेरिया असतात तेवढेच दाढीमध्ये असू शकतात.

स्रियांच्या मूत्रमार्गाची लांबी कमी असते. परंतु ओरल सेक्स करताना पुरुषांच्या दाढीतील बॅक्टेरिया लाळेमार्गे योनीत जातात. त्यामुळेही युरीन इंफेक्शन होते. त्यामुळे पुरुषांनो तुम्ही दाढी ठेवा परंतु तेथील स्वच्छताही तेवढी महत्त्वाची आहे. हायजीन कडेही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे.

तु्म्हाला माहिती आहे का जर रुबेला सारखा जंतू गर्भाशयापर्यंत गेला तर primary infertilty म्हणजे वंध्यत्व येऊ शकते. जे स्त्रियांसाठी खूप गंभीर आहे. त्यामुळे पुरुषांच्या दाढीने विनाकारण स्त्रियांना गंभीर आजाराला सामोरे जायला लागू शकते. म्हणून पुरुषांनी दाढी राखताना किंवा ओरल सेक्स करताना थोडी काळजी घ्या.

Visit : Policenama.com