लघवी करताना वेदना किंवा जळजळ होते का ? ‘ही’ आहेत कारणं आणि लक्षणं !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महिला असो किंवा पुरुष लघवी करताना त्यांना अनेक समस्या जाणवत असतात. जसं की, वेदना होणं, जळजळ होणं किंवा इतर काही समस्या जाणवते. या समस्या का होतात, याची लक्षणं काय आहेत याचीही माहिती घेऊयात.

का उद्भवते ही समस्या ?

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लघवीशी संबंधित समस्या जास्त येतात. हे एक प्रकारचं इंफेक्शन आहे जे मेडिकलच्या भाषेत डिस्यूरिया म्हणून ओळखलं जातं. जेव्हा गुप्तांगात बॅक्टेरिया होतात तेव्हा ही समस्या येते. महिलांमध्ये साधारणपणे 20 ते 50 वयोगटात ही समस्या उद्भवते.

ही आहेत इंफेक्शनची लक्षणं

– लघवीतून दुर्गंधी येणं
– पुन्हा पुन्हा लघवी पास होणं
– लघवीसोबत रक्त येणं
– चेस्ट आणि बॅकपेन
– ताप येणं

ही आहेत पुरुषांमधील लक्षणं

पुरुषांना जर डिस्यूरिया ही समस्या आली तर त्यांना प्रोस्टेट संबंधित समस्या जाणवात. पुरुषांमधील आढळणारी लक्षणं पुढील प्रमाणे

-स्वेलिंग होणं
– इजॅक्युलेशनच्यावेळी वेदना होणं
– लघवी करताना वेदना होणं
– पुन्हा पुन्हा लघवीला येणं

हेही कारण असण्याची शक्यता

लघवीशी संबंधित समस्या असतील तर याचा अर्थ असा नाहीये की, तुम्हाला इंफेक्शनच झालेलं आहे. हे स्टोनचेही संकेत असू शकतात. युरिनरी सिस्टीममध्ये जर स्टोन झाले तरीही सारखी लघवीला येते आणि लघवीचा रंग भुरका, गुलाबी दिसतो. याशिवाय ताप येणं, उलटी होणं, पाठदुखी, मुड चांगला नसणं अशी लक्षण स्टोन झाल्यावर देखील दिसतात.