‘किडनी’ समस्येची शंका दूर करण्यासाठी करा ‘ही’ स्वस्त ‘टेस्ट’ ! जाणून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी

पोलिसनामा ऑनलाइन – किडनी हा शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर टाकण्याचे काम करते, तिच्यातील नेफरोन्स फिल्टरप्रमाणे काम करतात. यामुळे रक्तशुद्धी होते आणि विषारी तत्व लघवीवाटे बाहेर टाकली जातात. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी ती सहकार्य करते. यामुळे हार्मोन्स रिलीज होतात, रक्तदाब नियंत्रणात राहतो. किडनीमध्ये काही समस्या झाल्यास विविध गंभीर आजार होऊ शकतात. किडनीची समस्या लवकर समजत नसल्याने अनेकदा गुंतागुंत निर्माण होते. यासाठी सॅन फ्रन्सिस्कोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी एक सोपी आणि स्वस्त चाचणी शोधून काढली आहे. या चाचणीतून किडनीचे आरोग्य कसे आहे ते समजू शकते.

कशी आहे चाचणी
ही चाचणी रूग्णांच्या लघवीतूल जास्त प्रोटीनचं प्रमाण मोजून सांगू शकेल की, भविष्यात किडनीसंबंधी गंभीर आजार होईल किंवा नाही. यामुळे रूग्णांना डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासणार नाही.

काय सांगतात संशोधक

* लघवीतील अत्याधिक प्रोटीन हा भविष्यातील किडनी आजाराचा संकेत असतो.

* ही चाचणी किडनी इंज्यूरी असलेल्या रूग्णांवर करता येत नाही.

* ही एक स्वस्त आणि कोणतीही चिरफाड नसणारी प्रक्रिया आहे.

* किडनीच्या समस्या बरी झाल्यानंतरही अनेकांना नेहमीच पुन्हा समस्या होतात.

* अनेकांना किडनी फेल, हृदयरोग, अकाली मृत्यूचा धोका असतो.