डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) म्हणजे काय ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् प्रतिबंधात्मक ‘उपाय’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम

डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणेज काय ?

डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) एक अशी स्थिती आहे ज्यात रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या विशेषत: पायात बनतात. 60 वर्षांपुढील कोणालाही हे प्रभावित करू शकतं. भारतात याचं 8 ते 20 टक्के एवढं प्रमाण आहे.

काय आहेत याची लक्षणं ?

– पायावर सूज येणं हे प्रमुख लक्षण. क्वचित दोन्ही पायांनाही सूज येते.
– पाय दुखणं
– पायात उबदारपणा जाणवणं.

रक्तप्रवाह अकडवणारी कोणतीही गोष्ट डीव्हीटीत परावर्तित होऊ शकते. त्याची मुख्य कारणं खालील प्रमाणे-

1) रक्तवाहिन्यात दुखापत
2) शस्त्रक्रिया, हृदयरोग किंवा गंभीर संसर्ग
3) काही औषधं
4) दीर्घकाळ निष्क्रियता

डीव्हीटीचा धोका वाढवणारे घटक –

– अनुवांशिक गुठळी होण्याचा विकार
– गर्भधारणा
– गर्भनियंत्रक गोळ्या
– लठ्ठपणा
– धूम्रपान
– हृदय निष्फलता
– दाहक आंत्र रोग

निदानासाठी चाचण्या –

1) डी डायमर चाचणी
2) अल्ट्रसाऊंड
3) व्हेनोग्राफी
4) सीटी किंवा एआरआय स्कॅन
5) पल्मनरी अँजिओग्राफी

डीव्हीटी प्रतिबंधक टप्पे –

1) जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करणं
2) पायांच्या स्नायूंचा व्यायाम करा.
3) पोटरीला घट्ट दाबून ठेवतील असे पायमोजे वापरा.
4) सक्रीय जीवनशैलीचं पालन करा.