10 हिरोंना भारी पडली होती ‘छम्मा छम्मा गर्ल’, आता ‘इंडस्ट्री’ आणि ‘पॉलिटिक्स’मधून ‘गायब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. विनोद असो किंवा निगेटिव्ह भूमिका तिने प्रत्येक भूमिका चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले पण उर्मिला जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये राज्य करू शकली नाही. चायना टाऊनमध्ये, उर्मिलाचा आयटम नंबर ‘छम्मा छम्मा’ अधिक लोकप्रिय झाला होता, आज उर्मिला चित्रपटांमधून पूर्णपणे गायब झाली आहे. आज तिचा वाढदिवस आहे जाणून घेऊया तिच्याविषयी काही किस्से….

https://www.instagram.com/p/B7yR7XrJ-89/

उर्मिला मातोंडकर हीचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी झाला होता. उर्मिलाला फक्त राम गोपाल वर्माच्या चित्रपटांमधून इंडस्ट्रीत सर्वाधिक यश मिळालं. उर्मिलाने ‘मासूम’, ‘जुदाई’, ‘सत्या’, ‘इंडियन’, ‘खूबसूरत’, ‘तेज़ाब’, ‘एक हसीना थी’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’ आणि ‘आग’ सारख्या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला.

उर्मिलाने चायना टाऊनमध्ये सुपरहिट आयटम नंबर दिला. आजही लोक या गाण्यावर थरथरताना दिसतात. असं म्हणतात की जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा चित्रपटापेक्षा तिचे ‘छम्मा छम्मा’ गाणे खूप प्रसिद्ध झाले होते.

https://www.instagram.com/p/B8DqnZ_px9z/?utm_source=ig_embed

राम गोपाल वर्मा यांच्यासोबत उर्मिला मातोंडकरने बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे. यातील बरेच चित्रपट चालले. परंतु राम गोपाल वर्माबद्दल असे सांगितले गेले होते की जेव्हा जेव्हा ते आपल्या चित्रपटांमध्ये कोणाला काम करायला लावत होते तेव्हा ते त्या व्यक्तीला इतर कोणत्याही दिग्दर्शकाबरोबर काम करू देत नव्हते. उर्मिलाच्या बाबतीतही असेच घडले. जेव्हा तिने राम यांच्याबरोबर शुटिंग सुरू केले तेव्हा इतर दिग्दर्शकांनी तिला चित्रपट ऑफर करणे बंद केले. काही काळानंतर राम आणि उर्मिलाची जोडी संपुष्टात आली आणि त्याबरोबर उर्मिलाचे करिअर देखील.

https://www.instagram.com/p/B7JBPnkpAF0/

तिचा शेवटचा चित्रपट ‘ब्लॅकमेल’ होता जो वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या वर्षीच उर्मिलाने राजकारणात प्रवेश केला होता. तिने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला पण तिचे नाणेही येथे चालले नाहीत. उर्मिला आजकाल कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे. उर्मिलाने 2016 साली मोहसिन अख्तरशी लग्न केले होते.