शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचा अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांकडून ‘इन्कार’

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन –  गेल्या दोन दिवसांपासून प्रसिध्द सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, मातोंंडकर यांनी स्वतः शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली होती. दरम्यान, मातोंडकर यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्ताला शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दुजोरा दिला होता.
शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा ऊर्मिला मातोंडकर यांच्याकडून इन्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मातोंडकर ह्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दुजोरा दिला होता. मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच 2019 ला त्यांनी कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. त्यावेळी भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता.

त्यानंतर त्या काही काळ राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होत्या. तसेच त्या काँग्रेसमध्ये नाराज असल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय समोर आल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांनी हा प्रस्ताव स्विकारल्याचे सांगण्यात येते होते. मात्र शिवसेना प्रवेश वृत्ताला खुद्द उर्मिला मातोंडकर यांनी आता फेटाळून लावले आहे.

You might also like