उर्मिला मातोंडकरची काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी, गटबाजीचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री-राजकारणी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. उर्मिला मातोंडकर यांनी लिहलेले पत्र फुटल्यानंतर त्यावर पक्षाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने त्या निराश झाल्या होत्या. अखेर त्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गटबाजीचा आरोप करत मातोंडकर यांनी राजीनामा दिला आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसच्या काही कर्यकर्त्यांनी पक्षाचे काम केलं नाही. या कर्यकर्त्यांची तक्रार मी मुबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्याउलट त्यांनाच पदं देण्यात आली अशा शब्दांत मातोंडकर यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय लिहले होते ‘त्या’ पत्रात ?

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले होते. ‘राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो राजीनामा स्वीकारला जाऊ नये. याचे कारण म्हणजे मुंबई काँग्रेसला मिलिंद देवरांसारख्या नेत्याची गरज आहे’, असे मातोंडकर यांनी पत्रात लिहिले आहे. मिलिंद देवरा हे मुंबई अध्यक्ष बनल्यानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे सर्वजण सकारात्मक दृष्टीने एकजूट होऊन काम करत आहेत. या मुळे आगामी विधानसभा निवडणूक देखील देवरा यांच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या पाहिजेत. म्हणूनच देवरा यांचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये, असे पत्रात लिहण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात उर्मिला मातोंडकर यांनी लिहिलेले पत्र फुटल्यामुळे त्या चांगल्याच नाराज झाल्या आहेत. मातोंडकर यांचे हे गोपनीय पत्र कुणी फोडले याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –