उर्मिला मातोंडकरने पराभवाचे खापर फोडलं ‘या’ कॉंग्रेस नेत्यांवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहून आपला पराभव  स्थानिक नेत्यांची कमतरता, कमकुवत नियोजन, कामगारांची कमतरता आणि पैशांच्या कमतरतेमुळे झाला आहे अशी तक्रार केली आहे. पत्रामध्ये उर्मिलाने निवडणूकीमध्ये आपल्या पराभवाचे खापर चीफ कॉर्डिनेटर संदेश कोंडविलकर आणि दूसरे पदाधिकारी भूषण पाटील आणि जिल्हा अध्यक्ष अशोक सूत्राले यांच्यावर फोडले आहे. १६ मेला उर्मिलाने पत्रामध्ये लिहले की, तिने निवडणूकीमध्ये विजयी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण वर नाव लिहलेले कॉंग्रेसमधील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले नाही. उर्मिलाला कॉंग्रेसने नॉर्थ मुंबईमधून तिकिट दिले होते पण तिचा पराभव भाजपचे गोपाल शेट्टी यांनी केला.

सध्या लोकसभेत झालेल्या पराभवाबद्दल काँग्रेसमध्ये मंथन चालू आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यापासून काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. याचबरोबर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. देवरा म्हणाले की, पक्षाला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय भूमिका बजावण्याची आशा व्यक्त करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत येईपर्यंत काँग्रेस पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांची सदस्यता घेऊन अस्थायी सामूहिक नेतृत्व (समिती) स्थापन करण्याची शिफारस देवरा यांनी केली आहे.

कॉंग्रेसच्या राजीनामा दरम्यान, नवीन काँग्रेस अध्यक्षाचा शोध आणि कर्नाटकमधील चालू असलेल्या संकटांमध्ये उर्मिला मातोंडकरचे हे पत्र पक्षाच्या नेत्यांसाठी डोकेदुखीपेक्षा कमी नाही. कारण पहिल्यांदा उमेदवाराने त्याच्या अपयशाचे खापर पार्टीच्या सहाकार्यांवर आणि नेत्यांवर फोडले आहे.

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’