‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर करणार ‘या’ पक्षात प्रवेश !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा लढलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र आता काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्या नवीन पक्षाच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता त्या खरंच शिवसेनेत जातात कि केवळ चर्चा ठरतात हे पाहणे महत्वाचे आहे.

उर्मिला मातोंडकर यांची शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याबरोबर नुकतीच फोनवर चर्चा झाली. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र फोनवरील चर्चा ही मैत्रीतून होती असे स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिल्याने नक्की काय आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे. यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, मराठी कलाकार म्हणून मातोश्रीशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आम्ही नेहमी बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नक्की काय प्रकरण आहे हे त्यांनाच माहित. लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेवर टीका केली नव्हती. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, हि चर्चा राजकीय नसून केवळ चांगले संबंध असल्यामुळे झाल्याची माहिती दोन्ही बाजूने दिली जात असल्याने या भेटीला राजकीय रंग न देण्याची विनंती देखील त्यांनी केली. मात्र आता थोड्याच दिवसात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like