सस्पेन्स मिटला, ऊर्मिला मातोंडकरांचा आज दुपारी शिवसेनेत प्रवेश, CM ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   प्रसिध्द अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या सेना प्रवेशाच्या वृत्ताबद्दल स्पष्ट इन्कार दर्शवला होता. मात्र अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाले आहे. मातोंडकर मंगळवारी (दि. 1) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Chief Minister Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन (Shiv Bandhan) बांधणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेत दाखल होणार आहे.

आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऊर्मिला मातोंडकर यांचा जाहीर प्रवेश होत आहे. त्यानंतर मातोंडकर पत्रकार परिषद घेऊन त्या त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल या संदर्भात निर्णय जाहीर करणार आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेत दाखल होणार आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेने या आधीच त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकिय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार आहे. मातोंडकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडी अधिक बळकट होईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

You might also like