UROKUL Pune | मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी ‘युरेथ्रोप्लास्टी’ वरदान : डॉ. संजय कुलकर्णी

0
80
UROKUL Pune | 'Urethroplasty' boon for bladder health: Dr. Sanjay Kulkarni; Five hundred specialist urologists from around the world participated in the two-day international workshop organized by Eurokul Urology Institute
file photo

युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत जगभरातील पाचशे तज्ज्ञ युरॉलॉजिस्टचा सहभाग

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – UROKUL Pune | “अपघातात तुटलेला लघवीचा मार्ग जोडणे, आक्रसलेला मूत्रमार्ग मोठा करणे, मूत्रमार्गातील अडथळा काढणे, लघवीचा मार्ग शेंड्याऐवजी अंडकोशाजवळून असेल, तर तो नीट करणे, यासह लिंगाची वक्रता दूर करणे, कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने ताठरता आणणे अशा मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी ‘युरेथ्रोप्लास्टी’ वरदान ठरत आहे,” असे प्रतिपादन युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (Urological Society Of India) अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी (Dr Sanjay Kulkarni) यांनी केले. (UROKUL Pune)

 

बाणेर येथील युरोकुल (UROKUL Pune) युरॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी यांच्या वतीने मूत्राशय मार्गाच्या किचकट शस्त्रक्रियांची दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. युरोकुल येथे डॉ. संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात लंडनचे तज्ज्ञ डॉक्टर प्रा. टोनी मंडी, कॅनडातील प्रा. पीपी साले, युरॉलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी, डॉ. श्रेयस भद्रनवार यांनी या शस्त्रक्रिया केल्या. बंटारा भवन येथे या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. जगभरातून आलेला ५०० युरॉलॉजिस्टने या शस्त्रक्रिया ‘याची देही याची डोळा’ पाहिल्या. बाणेर येथील १०५ बेडची सुसज्ज व अद्ययावत युरॅालॉजी इन्स्टिट्यूट असलेल्या ‘युरोकुल’मध्ये ही कार्यशाळा झाली. माहितीपूर्ण कार्यशाळेबद्दल सहभागी यूरोलॉजिस्टच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसत होता.

 

डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “लघवीच्या तुटलेल्या मार्गाला जोडणाऱ्या, मार्गातील अडथळा दूर करणाऱ्या, नपुसंकता दूर करणारी, दोन लहान मुलांच्या लिंगावरील शस्त्रक्रिया अशा दोन दिवसांत एकूण १५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. थेट प्रक्षेपणावेळी अनेक युरॉलॉजिस्टनी विचारलेल्या शंकांचे समाधान झाले. मूत्राशयाच्या आजारांबाबत उघडपणे बोलले जात नाही. तसेच यावरील उपचारांबद्दल फारशी माहिती नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु, अशा शस्त्रक्रिया करणारे अनेक युरॉलॉजिस्ट तयार व्हावेत, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजिली होती.”

प्रा. टोनी मंडी व प्रा. पीपी साले म्हणाले, की, “पूर्वी मूत्रमार्ग मोठा करण्यासाठी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया,
स्वतः नळी घालून उपाययोजना कराव्या लागत. आता ‘युरेथ्रोप्लास्टी’च्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांचे जीवन सुसह्य झाले आहे.
‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठीसुद्धा अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. लैंगिक जीवन सुधारण्यासाठी रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ बसवून त्याची शक्ती वाढवली जाते.”

 

‘युरोकुल’ची सामाजिक बांधिलकी’
‘युरोकुल’विषयी बोलताना लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या,
‘युरोलॉजी’ व ‘नेफ्फरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे.
मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत.
रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही,
हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे.
जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत.

 

Web Title :- UROKUL Pune | ‘Urethroplasty’ boon for bladder health: Dr. Sanjay Kulkarni; Five hundred specialist urologists from around the world participated in the two-day international workshop organized by Eurokul Urology Institute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | राष्ट्रवादी-काँग्रेससोबतची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार – दीपक केसरकर

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले