उर्से टोलनाका कर्मचाऱ्यांची कारचालकाला ‘बेदम’ मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा व उद्दामपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईहून आलेल्या कारचालकाने टोल भरला असल्याचे सांगूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांने इतरांना बोलावून त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने टोल घेण्याचा प्रकार उर्से टोल नाक्यावर शुक्रवारी सायंकाळी घडला.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी राहुल बाळु गोसावी, सदानंद जोशी इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाबासाहेब यादव (वय ४३, रा. सागरदीप सोसायटी, नेरुळ, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बाबासाहेब यादव हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईहून पुण्याकडे कारने येत होते. सायंकाळी सात वाजता ते उर्से टोल नाक्यावर आले. उर्से टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांला त्यांनी खालापूर टोल नाका येथे मी टोल भरला आहे. माझ्या अकॉऊटमधून पैसे कट झाले आहेत, असे सांगितले. तरी कर्मचाऱ्यांने तुम्हाला इथेही पुन्हा टोल भरावा लागेल, असे म्हणून राहुल गोसावी याने इतरांना बोलावून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like