Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | उरुळी देवाची- फुरसुंगी नगरपालिका करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश; दोन्ही गावे महापालिकेतून वगळून नवीन नगरपालिका स्थापनेचा अध्यादेश येत्या 15 दिवसांत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | पुणे महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट करण्यात आलेल्या उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावांबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. ही दोन्ही गावे महापालिकेमधून वगळून उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांची एकत्रित नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यासंदर्भातील तांत्रिक आदेश येत्या दोन आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती बैठकीनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

 

पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने उरूळी देवाची आणि फुरसुंगी या गावांचा समावेश आहे. या गावांसह ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम महापालिकेकडून सुरू असून अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच महापालिकेच्यावतीने या गावांमध्ये तीन टीपी स्किम देखिल राबविण्यात येत आहेत. महापालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर येथील नागरिकांकडून मिळकत कर आकारणी सुरू झाली. गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानीक नागरिकांच्या तक्रारी होत्या. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

 

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिका सुविधा देत नसल्याने समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करावी अशी मागणी केली होती. प्रामुख्याने मिळकत कराबाबत तक्रार केली होती. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांनी आज मुंबईत याबाबत बैठक घेतली.

या बैठकीमध्ये उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय झाला. या दोन्ही गावांची लोकसंख्या दीड ते दोन लाखांच्या आसपास असून गतीने विकास सुरू आहे.
या दोन्ही गावांची मिळून नवीन नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले,
अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
या बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत नगरविकास विभागाचे अप्पर सचिव,
जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख उपस्थित होते.

 

Web Title :- Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | Chief Minister Shinde’s order to make
Uruli Devachi-Fursungi Municipality; Ordinance for the establishment of a new municipal
corporation excluding both villages from the municipal corporation in the next 15 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा