Urvashi Dholakia | अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारचा भीषण अपघात

0
218
Urvashi Dholakia | bigg boss fame urvashi dholakia car accident see latest update
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील आपल्या खलनायकी भूमिकेतून देखील चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकीया (Urvashi Dholakia) यांच्या कारचा गंभीर अपघात झाला आहे. अभिनेत्री मुंबईतील एका स्टुडिओमध्ये जात असताना लहान मुलांच्या स्कूलबसने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात फारच भीषण असल्याचे समजले जात आहे. (Urvashi Dholakia)

 

सुदैवाने या अपघातात अभिनेत्री आणि तिची संपूर्ण टीम अगदी सुखरूप आहे. अभिनेत्री मुंबईतील मीरा रोडवर स्थित असणाऱ्या स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर उर्वशीने स्कूल बस विरोधात पोलिसात कोणतीही तक्रार दिली नाही. तिच्या मते हा केवळ अपघात होता आणि आम्ही सगळे एकदम सुखरूप आहोत. काळजी करण्याची काहीच गरज नाही. तर सध्या अभिनेत्रीला डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

 

उर्वशी (Urvashi Dholakia) आजवर टीव्ही जगात अनेक मालिकांमध्ये खलनायक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिला जास्त प्रसिद्धी बिग बॉस 6 मधून मिळाली होती. एवढेच नाही तर ती बिग बॉस 6 ची विजेती देखील होती. यानंतर तिने ‘कसोटी जिंदगी की’ आणि ‘नागिन’ सारख्या मालिकेमधून घराघरात पोहोचली. उर्वशी ढोलकीया आपल्या व्यवसायिक आयुष्या सोबतच खाजगी आयुष्यामध्ये देखील फारच चर्चेत होती. कारण उर्वशीने केवळ 16 व्या वर्षी लग्न केले आणि 17 व्या वर्षी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. लग्नाच्या काही वर्षांनी तिने पतीपासून घटस्फोट घेतला आणि दोन्ही मुलांचा सांभाळ स्वतः करत जगासमोर एक कर्तुत्वान स्त्री म्हणून उभी राहिली.

उर्वशी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. ती तिच्या मुलांसोबतचे फोटोज आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते.
उर्वशीला एक बिंदास अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते.
उर्वशी जरी दोन मुलांची आई असली तरी ती एकदम फिट आणि स्टायलिश आहे.
तिच्या फिटनेस वरून ती दोन मुलांची आई आहे असे कधीच म्हणता येणार नाही.
उर्वशीने सिंगल मदर होत या दोन्ही मुलांचा सांभाळ केला आहे.

 

Web Title :- Urvashi Dholakia | bigg boss fame urvashi dholakia car accident see latest update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime News | सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; औरंगाबादमधील घटना

Raigad District Bank Fire | रायगड जिल्हा बँकेला भीषण आग; कागदपत्रे एका क्षणात जळून खाक

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास