मोबाइलचा अतिवापर पडला महागात, ‘कोमोलिका’ला झाला टेनिस एल्बोचा ‘आजार’

पोलिसनामा ऑनलाईन – सातत्याने मोबाईल वापरणे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. असाच मोबाइलचा अतिवापर एका अभिनेत्रीला महागात पडला आहे. ही अभिनेत्री ‘कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे टेनिस एल्बो झाल्याचा खुलासा तिने केला आहे.

उर्वशी म्हणाली, काही दिवसांपूर्वीच मला टेनिस एल्बो झाल्याचे निदान झाले होते. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे मला टेनिस एल्बो झाला आहे. कारण माझे संपूर्ण काम मोबाइलवरच असते. मला माझ्या शोचे संपूर्ण काम फोनवरच करावे लागते. या शोचे सर्व एपिसोड मी स्वत: एडिट करते. त्यामुळे दिवसभर मला मोबाइल फोन पकडून काम करावे लागत आहे. त्याचाच हा दुष्परिणाम आहे असे तिने सांगितले आहे. अनेकदा काही फेकण्याच्या आणि मैदानी खेळ तसेच अ‍ॅथलिटीक्स खेळाडूंना ही व्याधी होते. कोपराचा अतिवापर केल्याने ही व्याधी होते. गृहिणी तसेच जास्त वेळ व्यायामशाळेत जाणार्‍या लोकांना ही व्याधी होते. यामुळे कोपराला प्रचंड वेदना होतात. कोपराजवळील स्नायूंची अधिक हालचाल झाल्याने ही व्याधी होते. विशेष म्हणजे कोपराजवळ ही व्याधी होत असली तरी तेथील स्नायूंमुळे मनगटांच्या हालचाली अवलंबून असतात. त्यामुळेच टेनिस एल्बोची व्याधी झालेल्यांना मनगटाजवळही वेदना होतात.