‘विराट’ प्रमाणे ब्लॅक वॉटर पिते उर्वशी रौतेला, इतकी आहे किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री उर्वशी रौतेला अलीकडेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. आपल्या तामिळ चित्रपटाचे शूटींग पूर्ण करुन ती दिल्लीहून परतली. या दरम्यान उर्वशी ब्लॅक जीन्स, टँक टॉप आणि क्रॉप ब्लेझरमध्ये दिसली. यासह, सर्वात जास्त चर्चा झाली तीच्या पाण्याची बाटलीची. उर्वशीच्या हातात काळ्या पाण्याची बाटली होती, जे प्रीमियम अल्कलाइन वॉटर आहे. ज्याला Fulvic Trace ने इंफ्यूज केेल जाते. वृत्तानुसार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीही ब्लॅक वॉटर पितो. हे पाणी हायड्रेटेड होण्यास मदत करते आणि पीएच हाय ठेवते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सेलिब्रिटी हे पाणी पितात. या पाण्याची किंमत 200 रुपये प्रति लीटर आहे.

एव्ही ऑर्गेनिक्सचे एमडी आकाश वाघेला यांनी सांगितले की, या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरल्या जाणार्‍या खनिजांचा रंग काळा असतो. 70 टक्के खनिजे पाण्यात मिसळतात, ज्यामुळे पाण्याचा रंग काळा होतो.

दरम्यान, उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सध्या तिची आगामी वेब सिरीज इंस्पेक्टर अविनाशचे शुटिंग करत आहे. यात ती रणदीप हूडाच्या अपोजिट भूमिकेत दिसणार आहे. पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांची ही वास्तविक जीवनाची कथा आहे. नीरज पाठक चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. रिपोर्ट्सनुसार, उर्वरशीने जिओ स्टुडिओबरोबर तीन सिनेमे साईन केले आहेत.

उर्वशी इंटरनॅशनल प्रोजेक्टचा देखील एक भाग आहे. ती इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजान सोबत दिसणार आहे. याशिवाय ती ‘ब्लॅक रोझ’ या बाइलिंगुअल चित्रपटातही दिसणार आहे. यासोबतच उर्वशी ‘वो चंद कहां से लाओगी’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. यात तिने टीव्ही अभिनेता मोहसीन खानच्या अपोजीट काम केले. उर्वशी व्हर्जिन भानुप्रिया या चित्रपटात दिसली होती.