Urvashi Rautela | नॅशनल टीव्हीवर अनिल कपूर यांनी उर्वशी रौतेलाची केली होती बेइज्जती; काय आहे ‘ते’ प्रकरण?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Urvashi Rautela | अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या खूपच चर्चेत आहे. तिकडे रिषभ पंतचा अपघात झाला तर दुसरीकडे उर्वशी विषयी चर्चा जोरदार सुरू झाली. ‘हेट स्टोरी 4’ मध्ये उर्वशीने तिच्या बोल्ड अदानी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. उर्वशीने चित्रपटांमध्ये कमाल जरी केली नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते. (Urvashi Rautela)

 

पुन्हा एकदा उर्वशी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे एकदा अनिल कपूरने मस्करीत उर्वशीची गजब बेइज्जती केली होती. त्या जुन्या आठवणी पुन्हा नव्याने सर्वांच्याच समोर येत आहेत. नॅशनल टीव्हीवर झालेल्या या बेइज्जतीमुळे उर्वशी हिरमुसली होती. ही घटना आहे 2019 सालची. जेव्हा ‘पागलपंती’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी उर्वशी, अनिल कपूर, कृती खारबंदा, पुलकित सम्राट हे सगळेच ‘बिग बॉस 13’ मध्ये पोहोचले होते. यावेळी खेळण्यात आलेल्या एका गेम मध्ये सर्वांनीच उर्वशीची खिल्ली उडवली होती. (Urvashi Rautela)

 

यावेळी अनिल कपूर सलमान खान सोबत एक गेम खेळताना उर्वशी आणि कृती दिसत होते. यावेळी सलमान खान आणि अनिल कपूरला एक एक प्रश्न विचारण्यात येणार होते. कृती सलमानला विचारते की “अशी कुठली गोष्ट आहे जी अनिल कपूरजी नी करायला नको?” त्यावर सलमान उत्तर देण्याआधीच अनिल कपूर यांचे उत्तर देतात की मला कोणीही जी जी म्हणू नये असे अनिल कपूर म्हणतात यावर उर्वशी त्यांना एके म्हणून संबोधते यानंतर सगळेच उर्वशीची मस्करी करायला लागतात. तर सलमान खान म्हणतो “अनिल कपूर कधीच रिटायर होणार नाही असे मला वाटते आणि उर्वशीकडे पाहत तो म्हणतो तू रिटायर होणार एक दिवस….. तू अनिलच्या आईची भूमिका साकारशील असं मला वाटते”. यावर अनिल कपूर म्हणतात उर्वशी सारखी आई असेल तर खूपच आनंद आणि पुन्हा सगळे हसायला लागतात.

याच दरम्यान उर्वशी हातवारे करून बोलत असते. तेव्हा अनिल कपूर तिला हटकत म्हणतात
की “आपण कोणत्या कार्यक्रमाचे होस्ट करत नाही…. नॉर्मल बोल….. इतके हातवारे करून का बोलतेस…..
मोकळेपणाने बोल…… घाबरू नकोस…” असे म्हणत पुन्हा एकदा सगळे तिची खिल्ली उडवत असतात.
त्यावेळी उर्वशीची अवस्था खूपच कठीण झाली होती. तिचा चेहरा फारच पडला होता.
खिलाडूवृत्तीने तिने सगळं काही सहन केलं मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या मनातील भावना सांगत होते.

 

Web Title :-  Urvashi Rautela | Anil Kapoor insulted Urvashi Rautela on National TV; What is the ‘it’ case?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील महिलेचे लपून फोटो काढणे गुप्तहेरांना आले अंगाशी; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

Dr Vishwas Mehendale Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन