15 व्या वर्षीच मिळाला होता पहिला ‘ब्रेक’, सनी देओलच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस उर्वशी रौतेला आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्वशी बॉलिवूडमधील बोल्ड आणि सुंदर अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. आपल्या लुक आणि टॅलेंटनं तिनं खूपच कमी वयात इंडस्ट्रीतील आपलं स्वप्न साकार केलं आहे. आज वाढदिवसानिमित्त आज आपण उर्वशीचा प्रवास जाणून घेणार आहोत.

उर्वशीचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 रोजी हरिद्वारमध्ये झाला आहे. मीरा रौतेला आणि मंवर सिंह रौतेला असं तिच्या आईचं आणि वडिलांचं नाव आहे. कोटद्वार तिचं होम टाऊन आहे. सेंट जोसेफमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उर्वशी दिल्लीला आली होती.

दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजमध्ये तिनं प्रवेश घेतला. वयाच्या 15 व्या वर्षीच तिला आपल्या करिअरचा पहिला ब्रेक मिळाला होता. विल्स लाईफ स्टाईल इंडिया फॅशन वीक हा तिचा पहिला प्रोजेक्ट होता.

2009 मध्ये उर्वशीनं मिस टीन इंडियाचं टायटल जिंकलं होतं. टीन मॉडेल म्हणून उर्वशी लॅक्मे फॅशन वीकचा हिस्सा बनली होती. तिनं अ‍ॅमेझॉन फॅशन वीकवरही रॅम्प वॉक केलं आहे.

2011 मध्ये उर्वशीनं 17 व्या वर्षी इंडियन प्रिंसेस, मिस टुरिज्म वर्ल्ड आणि मिस एशियन सुपरमॉडेलचा किताब जिंकला होता. याचवर्षी तिनं मिस टुरिज्म क्वीन ऑफ द ईयरचा किताब आपल्या नावावर केला होता.

उर्वशीला इशकजादे सिनेमा ऑफर झाला होता. परंतु तिला मिस युनिव्हर्सवर फोकस करायचा होता. 2012 मध्ये तिनं मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकला होता.

2015 मध्ये उर्वशीनं पुन्हा मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकला. दोन वेळा मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकणारी उर्वशी पहिली मॉडेल बनली. 2015 मध्ये मिस युनिव्हर्समध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. हा किताब जरी ती जिंकू शकलेली नसली तरी खूपच कमी वयात तिनं खूप सारे किताब आपल्या नावावर केले आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

View this post on Instagram

w/ the vibes 📸📸📸

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

View this post on Instagram

Kisses 😘 ♥️

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

 

You might also like