…म्हणून ऋषभ पंतने अभिनेत्री उर्वशीला केलं ‘ब्लॉक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी सोशल मीडियावर चर्चेमध्ये असते. ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेमध्ये असते. बॉलिवूडमध्ये तिचे अनेक कलाराकांशी नाव जोडले गेले होते. दरम्यान उर्वशी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. आता ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले आहे.

https://www.instagram.com/p/B5zf9pJgWD2/

सोशल मीडियावर ऋषभ पंतने गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचा फोटो शेअर करत उर्वशीसोबत असलेले अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे ऋषभच्या आयुष्यात उर्वशी नसून ईशा आहे हे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी सतत ऋषभला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे ऋषभने तिला ब्लॉक केले आहे. त्या दोघांनी परस्पर सामंजस्यने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

10 डिसेंबर 2019 रोजी उर्वशी आणि ऋषभ 11च्या सुमारास डेटवर गेल्याचे म्हटले जात आहे. हे दोघे जूहूमधील ईस्टला हॉटेलमध्ये एकत्र डिनर करताना दिसले. विशेष म्हणजे T20 मॅच सुरु होण्याच्या एक दिवसआधी हे दोघे डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण ऋषभने गर्लफ्रेंड सोबतचा फोटो पोस्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

https://www.instagram.com/p/B4r1sOOgYOx/

https://www.instagram.com/p/B4ozpwBgj5R/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर, तिचा ‘पागलपंती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूज देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच उर्वशी एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे सुशी गणेशन यांनी दिग्दर्शन केले आहे.

https://www.instagram.com/p/BzSqdzegk2P/

 

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/