विराट कोहलीच्या ‘गळ्यात’ पडली अभिनेत्री उर्वशी रौतेला ; पुढे झाले ‘असे’ काही, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्ल्डकप २०१९ मधील भारत पाकिस्तान सामना रविवारी (दि १६ जून) पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुन पराभव केला. भारताचा विजय झाल्यानंतर अनेकांनी टीम इंडियाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाने आपली विजयाची परंपरा कायम राखली. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आणि आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी बॉलिवूड स्टारही सामना सुरू असताना तेथे उपस्थित होते. बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेलाही सामना पाहण्यासाठी आली होती. हा सामना संपल्यानंतर उर्वशीने एक फोटो पोस्ट केला. त्यामुळे उर्वशी प्रचंड ट्रोल झाली आहे.

भारत-पाक क्रिकेट सामना संपल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने विराट कोहलीच्या स्टॅच्युसोबत एक फोटो क्लिक केला आणि तिच्या इंस्टाग्रामवरून शेअरही केला. तिचा विराटसोबतचा फोटो मात्र नेटकऱ्यांच्या पसंती पडला नाही असे दिसत आहे. कारण या फोटोमुळेच नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केले आहे.

उर्वशीने विराट स्टॅच्युच्या गळ्यात हात टाकून उभी होती. विराटच्या स्टॅच्युच्या खूपच जवळ थांबल्याने चाहत्यांची नाराजी ओढवली आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. अनेकांनी असं म्हटलं आहे की, अनुष्काने विराटकडे लक्ष द्यायला हवे. विराटला बिघडवू नकोस असेही काहींनी कमेंटमध्ये म्हटले आहे. उर्वशी ही इंस्टा पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. 1 मिलियनहून अधिक लोकांनी उर्विशीच्या या फोटोला लाईकही केले आहे. काहींना उर्वशीचा हा फोटो आवडला आहे असेही दिसत आहे.

You might also like