उर्वशी रौतेलाचं वाळवंटात Bold फोटोशुट ! ‘एवढ्या’ लाखांचा घातलाय ड्रेस

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. ती कायमच बिकिनीत दिसत असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळंही उर्वशी चर्चेत असते. उर्वशीचे काही फोटो समोर आले आहेत. एका मॅगेझिनसाठी तिनं हे फोटोशुट केलं आहे. परंतु यावेळी तिनं घातलेल्या ड्रेसेसची किंमत ऐकाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.

https://www.instagram.com/p/CIpyNYKhQPG/

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. प्रसिद्ध अरबी मॅगेझिन सोल अरेबिया (Soul Arabia) साठी तिनं हे फोटोशुट केलं आहे. या मॅगेझिनच्या कव्हर पेजवरही ती दिसत आहे. फोटो शेअर करताना उर्वशीनं सांगितलं आहे की, ती पहिली इंडियन/एशियन अ‍ॅक्टर आहे जी या इंटरनॅशनल मॅगेझिनच्या कव्हरवर दिसली आहे.

https://www.instagram.com/p/CIpeevZBf2L/

उर्वशीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ऑरेंज गाऊन आणि काही फोटोत रेड कलरचा गाऊन घातला आहे. फॅशन डिझायनर मायकल सिंको (Michael Cinco) चे ड्रेसेस तिनं घातले आहेत. तिच्या एका रेड कलरच्या गाऊनची किंमत 25 लाख रुपये एवढी आहे. याशिवाय ऑरेंज गाऊनची किंमतही 25 लाखांच्या पुढं आहे. म्हणजेच उर्वशीनं जे ड्रेस घातले आहेत ते 50 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे आहेत.

उर्वशीनं फोटो शेअर करतान खास कॅप्शनही दिलं आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. सुल्तान अबू टायर हे सोल अरेबिया मॅगेझिनचे एडिटर इन चीफ आहेत.

https://www.instagram.com/p/CInLZvPhAMd/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसली. याशिवाय तिनं एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमातही काम केलं आहे. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/CInayFBB3AF/

https://www.instagram.com/p/CIkvyenBwNf/