Urvashi Rautela Latest Video | उर्वशी रौतेलाच्या अजब अंदाजानं चाहते झाले घायाळ, व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली ‘रेखा’ची आठवण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. उर्वशी सतत सोशल मीडियावर (Urvashi Rautela Latest Video) आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोला चांगलीच पसंती दर्शवत असतात. तसेच अनेक चाहते तिच्या पुढील फोटोसाठी आतुरतेने प्रतीक्षा करताना दिसतात. मात्र उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला उर्वशीचा हा व्हिडीओ (Urvashi Rautela Latest Video) चाहत्यांनी चांगला डोक्यावर घेतला आहे.

 

उर्वशीचा हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोशूट करताना दिसत असून, कॅप्शनमध्ये तिनं भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट लिहिली आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांनी कमेंटमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिला कमेंटमध्ये रेखा असं संबोधलं आहे. तिचा व्हिडिओमधील लूक बघून अनेक चाहत्यांनी तिला बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार रेखा सोबत तिची तुलना केली आहे. अनेक चाहते तिला कमेंटमध्ये प्राऊड इंडियन म्हणत आहेत. व्हिडिओमधील उर्वशीचा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून, तिच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे. त्याबरोबरच चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करून तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केलंय.

 

दरम्यान, उर्वशीचे (Urvashi Rautela Latest Video) इंस्टाग्राम वर जवळपास 45.3 मिलियनहून अधिक फॉलोवर आहेत. तर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी 200 हजारांहून अधिक लाईक्स तर, 2 हजारांपेक्षा जास्त कमेंट आले आहेत.

 

 

Web Title :- Urvashi Rautela Latest Video | urvashi rautela latest instagram video is viral fans reacalls her bollywood legend actress rekha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bazar24Store मध्ये पुण्यातील महिलांना घरबसल्या हजारो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या

 

Post Office Saving Scheme | तुम्ही सुद्धा उघडले असेल PPF आणि सुकन्या समृद्धीमध्ये खाते तर आता होईल मोठा फायदा; सरकारने दिली माहिती

 

Lata Mangeshkar Health Update | ‘या’ कारणामुळं दोन दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला