‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज !


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेला एक फिट अ‍ॅक्ट्रेस लॉकडाऊनमध्ये तिनं सर्वांनाच आता फिटनेस चॅलेंज दिलं आहे. उर्वशीनं बॉडी बाय उर्वशी चॅलेंजला सुरुवात केली आहे. तिची इच्छा आहे की, लॉकडाऊनमध्ये चाहत्यांनीही फिटनेसवर लक्ष द्याव.

https://www.instagram.com/p/CAFLoAFgSNo/

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती वर्कआऊट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. उर्वशी म्हणते, “चला आता कोणताही बहाणा नको. क्वारंटाईनमध्ये #BodyByUrvashi चॅलेंज. मी आशा करते सध्या सगळे हेल्दी आहेत. सुरक्षित आहेत.”

https://www.instagram.com/p/B_6smZ2Ald9/

काही दिवसांपर्वीच उर्वशीनं इंस्टावरून चाहत्यांना व्हर्चुअल डान्स मास्टर क्लासची माहिती दिली होती. यात तिनं फ्रीमध्येच झुंबा आणि लॅटिन डान्स शिकवला होता. टिकटॉकवरून यासाठी1.8 कोटी लोकांनी तिला जॉईन केलं होतं. यातून तिला 5 कोटी रुपये मिळाले होते. हे तिनं कोरोनाच्या लढाईत दान केले होते.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरीही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं
सनी देओलसोबत डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/B_y-lh2gm1u/

https://www.instagram.com/p/B_o1Acng-3G/

https://www.instagram.com/p/B_jlEN1gKED/