अभिनेत्री उर्वशी रौतेलानं शेअर केला ‘BOLD’ व्हिडीओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या एका हॉट आणि बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या बोल्ड व्हिडीओत उर्वशी ठुमका गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. सध्या उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B5K07kWATqs/

सोशल मीडियावर सक्रिय असणारी उर्वशी रौतेला गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा हिस्सा बनत आहे. कधी ती आपल्या बिकीनी फोटोमुळे तर कधी हॉट व्हिडीओमुळे चर्चेत येते. कधी तिचा डान्स व्हिडीओदेखील व्हायरल होत असतो. चाहत्यांना आकर्षित करायची एकही संधी उर्वशी सोडत नाही. आजकाल सिनेमांपेक्षा तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओच जास्त चर्चेत राहतात. सध्या ठुमका गाण्यावरील तिचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 2.2 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

https://www.instagram.com/p/B5SQ5ZuAnaO/

उर्वशीला अद्यापही इंडस्ट्रीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. अजूनही ती आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुकताच तिचा पागलपंती सिनेमा आला होता. या सिनेमात तिला घेण्यावरूनही बरीच चर्चा झाली. असे असले तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/B5Rwqv9A_PG/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती पागलपंती सिनेमात झळकली. या सिनेमात तिच्यासोबत अर्शद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, कृती खरबंदा हे कलाकार दिसले. जॉन अब्राहम आणि इलयाना डिक्रूज स्टारर पागलपंती हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 रिलीज झाला. सिंह साहब द ग्रेट या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ती हनी सिंगच्या लव डोस या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B5RwofyAXDn/

https://www.instagram.com/p/B5PXm81ArUr/

https://www.instagram.com/p/B5DNVrJA5P1/

https://www.instagram.com/p/B5A01N0A9u0/

https://www.instagram.com/p/B4r1sOOgYOx/

https://www.instagram.com/p/B4m2lZeA0XJ/

https://www.instagram.com/p/B3y6T9cAeU0/

Visit : Policenama.com